Categories: सामाजिक

तब्बल १० हजार शिवप्रेमींसाठी ‘या’ मंडळाने केली भोजनाची व्यवस्था…

MH13NEWS Network

सोलापूर – शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. प्रत्येक मावळयांच हित ते जोपासत होते, महाराजांनी अनेक कल्याणकारी कामे केली होती, याचाच आदर्श ठेवून शिवजन्मोत्सव निमित्त एक लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील शिवप्रेमी माताभगिनीसह युवक ही मिरवणुकीत सहभागी होतात, हाॅटेलच जेवण परवडत ही नाही आणि मिरवणूक पाहून उपाशीपोटी उशिरा गावाकडे परत जातात त्या शिवप्रेमींची अडचण लक्षात घेऊन जयंतीनिमित्त मिरवणूक वा अन्य गोष्टींना फाटा देऊन पोटभर जेवण देऊन शिवप्रेमींना तृप्त करून छत्रपतींच्या चरणी आपली सेवा समर्पीत करण्याचं काम मागील वर्षा पासून करत आहेत. मागील वर्षी ही दहा हजार महिला, लहान मुलं, बंदोबस्तासाठी आलेले पोलिस, जेष्ठ नागरिक आणि युवकांनी लाभ घेतले. स्वःखर्चातून या अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा केल्या बद्दल अमोल बापू शिंदे यांच राज्यभरात कौतुक झाले आहे.

यंदा ही १९ फेब्रुवारी रोजी सायं ८ वा. पासून दहा हजार (१०,०००) शिवप्रेमीं आणि बंदोबस्तासाठी तैनात पोलिस बांधवांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील “यात्री लाॅजच्या मागे” बाजी अण्णा मठा शेजारी टेबल आणि खुर्चीवर भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व लहान मुलं यांच्या साठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

दि १८ फेब्रुवारी रोजी सायं पाळण्याच्या कार्यक्रमास उपस्थित महिला भगिनींसाठी पिण्याच्या पाण्याची व आसनव्यवस्था ही करण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जन्मेंजय महाराज भोसले , संस्थापक – श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ. अक्कलकोट तर मा. अंकुश शिंदे साहेब , पोलिस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते मा. आ. विजयकुमार देशमुख माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. सौ. श्रीकांचना यन्नम , महापौर , सो.म.न.पा सोलापूर, मा. दिपक तावरे साहेब आयुक्त सो.म.न.पा. मा. रवींद्र आवळे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, मा. शिवाजीराव सावंत , जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवसेना , सोलापूर मा. पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख शिवसेना, सोलापूर , मा. महेश कोठे, विरोधी पक्षनेते,‌ सो.म.न.पा. सोलापूर, ह.भ.प. सुधारक महाराज इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या स्नेहभोजनाचा सर्व शिवप्रेमी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक अमोल ( बापू) बाळासाहेब (अण्णासाहेब ) शिंदे , मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती संकेत (भाऊ) शिवाजी ( महाराज) पिसे आणि थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस अमोल बापू शिंदे , अनिकेत पिसे, अनंत येरंकोल्लू , अमोल कदम ,गिरीराज शेंगर, योगेश पवार ,प्रताप चव्हाण,तुकाराम मस्के,ईमतीयज कमिशनर, यांच्या सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago