Categories: राजकीय

दिलीप माने सर्व समाजघटकाचा विश्वासू चेहरा ; गणेश वानकर

सोलापूर- ( प्रतिनिधी )- शहर मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप माने हे सर्व समाजघटकाचा विश्वासू चेहरा असून कोणत्याही परिस्थितीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भगवा फडकेल असा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी व्यक्त केला.

शहर मध्यचे महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ साठे देशमुख वस्ती,विनायक नगर शिवशक्ती  शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक मंडळ,अंत्रोळीकर नगर ,सुनील नगर न्यू स्टार मित्र मंडळ आदी ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी जिल्हाप्रमुख वानकर होते . जिल्हाप्रमुख  वानकर  म्हणाले,केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चांदा ते बांदा महायुतीचे सरकार असताना शहर मध्यचे उमेदवार दिलीप माने यांनासुद्धा भरघोस मताधिक्याने निवडून देणे गरजेचे आहे. सत्ता महायुतीची आणि  लोकप्रतिनिधी अन्य पक्षाचा  असेल तर विकासकामे करताना अनेक अडचणी येतात. विकासकामे गतीने होण्यासाठी महायुतीचे उमेदवार दिलीप माने हाच एकमेव पर्याय असल्याचेही जिल्हाप्रमुखांनी सांगितले.


यावेळी संदीप हंचाटे,विजय लुंगसे,गणेश राऊत,गोविंद मसाळ , सारंग ढावरे , अमित जाधव, कुमार कोकाटे,प्रभाकर धायगुडे,विकास रुपनर , प्रल्हाद शिंदे,गिरीश तडका ,राकेश आरकाल,राजशेखर यलदी , भरत करणकोट,राजेश गाजूल,गणेश कैरमकोंडा,विनायक चौधरी,श्रीनिवास जक्कापल्ली,लक्ष्मण निरंजन,भुमेश अंकाराम,सुनील चव्हाण,अंबादास श्रीमल,महेश खरटमल , वीरेश पोबत्ती आदी उपस्थित होते.

युवा सेना होम टू होम
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ युवा सेनेने होम टू होम प्रचार केला. युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली फलमारी चौक,दत्त नगर,विनायक नगर, न्यू सुनील नगर आदी परिसरात घरोघरी जाऊन दिलीप माने यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी अमर बोडा,सुमित साळुंखे,प्रल्हाद शिंदे,रवी कोकुल,गुरुनाथ शिंदे,योगेश भोसले आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘रोहन’चा वाढदिवस ठरला आरोग्यदायी ; प्रतिबंधित क्षेत्रात केली अशी मदत

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिबंधित क्षेत्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप केल्याने मुलगा रोहन…

1 hour ago

Morning Update : 4 पुरुष तर 3 महिला बाधित ; 1 मृत

MH13 NEWS Network  आज सोमवारी सकाळी  7 बाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली…

8 hours ago

सोलापुरात नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण ; 5 जणांचा मृत्यू

आज प्राप्त झालेले एकूण अहवाल 120 असून निगेटिव्ह अहवाल 102 आहेत. पॉझिटिव्ह अहवाल 18 आढळून…

20 hours ago

सध्या 19 हॉस्पिटल ; म. फुले जनआरोग्य योजनेत सहभागी व्हावे.!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार ढेले यांचे आवाहन सोलापूर दि. 24 - सोलापूर शहर आणि…

22 hours ago

Live : संकटात ‘राजकारणा’पेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे- मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊन शिथिल करतांना विविध क्षेत्रांना गती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दिनांक २४: संकटाच्या काळात राजकारण न…

1 day ago

मोठा निर्णय : राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

MH13 NEWS Network  मुंबई, दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य…

1 day ago