‘मोदी सरकार’ कष्टक-यांच्या विरोधात ;अंगणवाडी महिला कर्मचारी युनियनची निदर्शने

MH13 NEWS Network:

केंद्र सरकारच्या कामगार-कष्टक-यांच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी संपाच्या पार्श्वभुमीवर येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. सुरवातीला चार हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या पुतळ्यांना वंदन करून मोर्च्याची सुरवात करण्यात आली. विविध मागण्याचे फलक,बॅनर कामगारांनी हातात घेऊन घोषणा देऊन सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आवाज उठवला. त्यानंतर मोर्चा पार्क चौकातून जिल्ह्याधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.


वक्त्यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर ताषेरे ओढले. सरकारने खाजगीकरणाचे मोठया प्रमाणात धोरण अवलंबविल्याने सरकारी व सार्वजनिक क्षेत्राचे मोठया प्रमाणात खाजगीकरण सुरु झाले व देशाची नॅसर्गिक तसेच इतर संपत्ती कवडीमोल भावाने – भांडवलदारांच्या घशात घालण्यात येत आहे. अस्तित्वात असलेल्या कामगार कायदयाची अंमलबजावणी करण्याची गती कमी होवून कंत्राटीकरणात वाढ झाली,त्यामुळे कामगारांना १० ते १२ तास काम, सामाजिक सुरक्षा, अधिकारांपासून वंचित ठेवून कामगारांच्या शोषणात प्रचंड वाढ केली. त्यातच मोदी सरकारने कामगार कायदयात सुचवलेले कामगार विरोधी बदल प्रत्यक्षात अंमलात आणायला सुरवात केली आहे. कामगारांनी लढुन मिळवलेले सर्व अधिकार नष्ट होत असल्याचे सांगितले.
तसेच अंगणवाडी सेवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,
1) त्यांना मानधन नको तर वेतन द्या, व निवृत्तीनंतर पेन्शन द्या,
2)निवडणुकीच्या कामाचे मानधन द्या .
3)कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करू नका, त्यांचे समायोजन करू नका.
4)अंगणवाडयांचे खाजगीकरण करू नका.
5)3 अपत्य असल्यास सेवा बडतर्फ करायचा निकष अंगणवाडयांना लावू नका.
6)थकीत फरक, व वेतन त्वरित द्या.
या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या मांडण्यात आल्या.
मोर्चात सोलापूर अध्यक्ष- पार्वती स्वामी मॅडम, छाया तिप्पट, एस.बी.आगलावे, जाधव, संघटक-सिद्धार्थ प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले व जिल्हाधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन, चर्चा करून मोर्चाची सांगता झाली.
मोर्चात सुमारे 500 महिला सहभागी झालेल्या होत्या,
सोलापूर शहरातील एक प्रचंड मोठा असा लक्षवेधी मोर्चा अंगणवाडी सेवकांनी आज काढला व 1 दिवसीय संप यशस्वी केला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

11 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago