सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का : यंदा निवडणूक लढवायचीचं …म्हणून..!

दीपक साळुंखे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

0
1125

महेश हणमे, 9890440480

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिलाय. दीपक आबांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू म्हणून दीपक आबा यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ग्रामीण पातळीवर राष्ट्रवादीची फळी मोठ्या प्रमाणावर विस्कटू शकते.

दीपक आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं अजून स्पष्ट झालेलं नाही.

हा आहे राजीनामा पत्रातील मजकूर
मा. आमदार श्री. जयंतरावजी पाटील साहेब,
प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मुंबई.
महोदय,
आपण व माझे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय आ. अजितदादा पवार साहेब
यांनी आतापर्यंत विश्वासाने दिलेली पक्षाची जबाबदारी मी त्याच विश्वासाने व प्रामाणीकपणे पार पाडलेली
आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्याची मी सांगोला
विधानसभेची निवडणुक कोणत्याही परिस्थीतीमध्ये यावेळेला लढवावी अशी सततची आग्रही मागणी व
कार्यकर्त्यांची मनापासुनची इच्छा आहे.

मी आपणाकडे सांगोला विधानसभेच्या तिकिटाची मागणी केलेली आहे. पक्षाकडुन व आपणाकडुन
मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तथापी सांगोला विधानसभेच्या निवडणुकीच्या कामकाजामुळे मला
सांगोला तालुक्यामध्येच भरपुर वेळ दयावा लागणार असल्यामुळे जिल्हयातील पक्षाच्या कामाला मला वेळ
देणे अशक्यप्राय आहे.

त्यामुळे मी आज या पत्राव्दारे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या(ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदाचा
राजीनामा देत आहे. तरी कृपया याचा स्वीकार व्हावा व सदरच्या जबाबदारीतुन मला मुक्त करण्यात यावे,
ही विनंती असल्याचं राजीनामा पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here