राज्यभर उद्या एकाच दिवशी ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम

MH13 NEWS, Network

मुंबई, दि. 2 : महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व यासंदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी उद्या, दि. 3 जानेवारी रोजी राज्यभर एकाच दिवशी ‘सायबर सेफ वुमन’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने ही मोहिम राबविण्यात येणार आहे. डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सायबर गुन्हे होत आहेत. यामध्ये विशेषतः महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आदी गुन्हे होत आहेत. सायबर गुन्ह्यांची तसेच अशा गुन्ह्यासंदर्भातील कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यांमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, शाळा/महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, अंगणवाडी सेविका, विविध स्वयंसेवी संस्था, महिला दक्षता समितीचे सदस्य यांच्यासह महिला व बालके सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.

या मोहिमेत इंटरनेटवरील फिशिंग, वैवाहिक विषयक साईटवरील फसवणूक ओळख चोरी, फोटोमधील फेरबदल, बँकासंदर्भातील फसवणूक, बालकासंदर्भातील पोर्नोग्राफी, सायबर बुलिंग, ऑनलाईन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, सायबर मानहानी यांची माहिती व यापासून प्रतिबंधात्मक उपाय यासह सायबर गुन्ह्यासंदर्भातील कायदे तसेच समाजमाध्यम (सोशल मीडिया) वापरण्यासंदर्भातील घ्यावयाची काळजी याची माहिती जिल्ह्यांमधील कार्यशाळेत देण्यात येणार आहे.

जबाबदार नेटिझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना चांगल्या सायबर पद्धतींविषयी जागरूक करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या मोहिमेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

बदलत्या काळात गुन्हेगारी विश्वही नवनवीन माध्यमांचा वापर करत आहे. डिजिटल युगात गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे करत आहेत. त्यातून महिला व बालकांचे लैंगिक शोषण व फसवणूक करत आहेत. अशा घटनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही मोहिम महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

1 hour ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

2 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

13 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

18 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

22 hours ago