‘त्या’ व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश

MH13NEWS Network

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून याचा ट्युटोरियल व्हिडिओ ( प्रशिक्षण चित्रफित) शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मोबाईलवर पाठविण्यात आला आहे. या मोबाईल लिंकमध्ये झालेल्या छेडछाडीची शासनाने गंभीर दखल घेतली असून याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.  शेतकऱ्यांना काही शंका असल्यास मंत्रालयस्तरावर संपर्क कक्षाद्वारे त्यांना योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे.

ही  योजना  दि. २७ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. ही शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना पुढील खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

या योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शेतकऱ्यांसाठी एक ट्युटोरियल व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कृषी विभागानेसुद्धा हा ट्युटोरियल व्हिडिओ (प्रशिक्षण व्हिडिओ)  एस.एम.एस. प्रणालीद्वारे त्यांच्याकडे उपलब्ध एम किसान पोर्टलवर उपलब्ध शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु, शासनाच्या असे निर्दशनास आले आहे की, कृषी आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकमध्ये छेडछाड झाली आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली आहे आणि यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश  दिलेले आहेत. सोबतच सर्व शेतकऱ्यांना या ट्युटोरियल व्हिडिओची योग्य लिंक कृषी आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

शेतकऱ्यांना यासंदर्भात काही शंका असल्यास त्यांचे शंका समाधान करण्यासाठी मंत्रालय स्तरावर संपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षातील दूरध्वनी क्रमांक ८६५७५९३८०८, ८६५७५९३८०९, ८६५७५९३८१० असे असून त्यावर कार्यालयीन कामकाजाच्यावेळेत संपर्क करता येइल.

योजनेच्या सविस्तर माहितीसाठी http:/mjpsky.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago