Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK

सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा मृतदेह वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर घरच्या मंडळींनी त्या महिलेचा अंत्यविधी उरकला,  त्यानंतर मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह मिळाला. याप्रकरणी सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाची हकीकत अशी की, सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका महिलेस श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना त्या महिलेच्या स्वॅबचे डॉक्टरांनी तपासणीसाठी नमुने घेतले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वीच हॉस्पिटल प्रशासनाने त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन टाकला.

मृत महिलेच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन 27 मे रोजी  महिलेचा अंत्यविधी उरकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेस कोरोना झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाली. त्यामुळे अंत्यविधीचा आलेल्या नातेवाईकांमध्ये आणि शेजारच्या लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत संसर्गजन्य रोग पसरवण्यासाठी आणि इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी यशोधरा हॉस्पिटलच्या प्रशासनाविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डफरिन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर विठ्ठल सोडल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

त्या महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे वैद्यकीय अहवाल प्रलंबित आहेत.

जेलरोड पोलीस ठाण्यात 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून स.पो.नि. लिगाडे हे पुढिल तपास करीत आहेत.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago