श्री विठ्ठल मंदिर विकास आराखडा तयार करा ; डॉ.नीलम गोऱ्हे

0
25

मुंबई, दि. 9 : पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिराचे संरक्षण व सुशोभीकरण करण्यासाठी मंदिराच्या पायरीपासून ते कळसापर्यंत सर्वंकष भागाची पुरातत्व विभागाकडून तपासणी करुन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

पंढरपूर देवस्थानाचे पुरातत्व विभागाकडे प्रलंबित प्रश्न व समन्वय यासंदर्भात विधानभवन येथे आयोजित बैठकीत डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, विठ्ठल रुक्म‍िणी मंदिर समितीच्या सहअध्यक्ष ॲड. माधवी निगडे, श्री. सुनिल उंबरे, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, समितीने मंदिराचा विकास आराखडा विधी व न्याय विभागाला पाठवून मंजूर करुन घ्यावा. हा आराखडा तयार करताना भाविकांच्या भावना व मंदिराचे प्राचीन सौंदर्य याला कुठेही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. या विकास आराखड्यात मंदिराच्या संलग्न 28 परिवार देवतांच्या मंदिरांचा देखील सुशोभीकरणात समावेश करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here