घटनेची पायमल्ली ही लोकशाहीची निर्घृण हत्या ; कॉ. नरसय्य्या आडम

मा क प कडून काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध

0
206

MH13News,network

सरकारने 370 कलम रद्द करताना जम्मू आणि काश्मीर मधल्या जनतेला विश्वासात न घेता,तिथला नागरी समाज,राजकीय पक्ष नेते,लोकप्रतिनिधी यांना नजरकैद करून,संदेश व दळणवळण पूर्णतः बंद करून,144 कलम जारी केले, दर 100 मीटर अंतरावर लष्करी सैन्य तैनात केले एक प्रकारचे दहशतीचे वातावरणाची निर्मिती केले अर्थातच भाजप सरकार घटनेची पायमल्ली करून लोकशाहीची निर्घृण हत्या केल्याची टीका माकप चे केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार आडम यांनी केली.
बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट वर सरकारने 370 बाबत असंवैधानिक निर्णय घेतला याचा तीव्र निषेधार्थ काळे झेंडे दाखवून जोरदार पावसात तब्बल 1 तास घोषणाबाजी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,भाजप सरकार 370 बाबत दिलेले अभिवचन पाळले नाही,तिथल्या जनतेची फसगत केली.दबावतंत्र वापरून यंत्रणेचा गैरवापर करून कलम 370 रद्द करण्याची काय गरज होती असा सवाल त्यांनी केले जर आपणाला रद्दच करायचे असेल तर लोकशाही मार्गाने का केला नाही एकंदरीत एकाधिकारशाहीची ही नांदी असल्याचा इशारा सरकार कडून दिला जात आहे.याला कडवी टक्कर मार्क्सवादी लोक देतील आणि देशात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखतील असे प्रतिपादन केले.
यावेळी माकप चे जिल्हा समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here