कोरोना विषाणू : राज्यात केवळ 1जण निरीक्षणाखाली

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला

मुंबई, दि. 13 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 177 प्रवासी बाधित भागातून आले असून त्यांचा 14 दिवसांपर्यंतचा पाठपुरावा सुरु आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३० हजार ४४२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १७७ प्रवासी आले आहेत त्यापैकी १०४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

दि. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४३ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ४२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. आजवर भरती झालेल्या ४३ प्रवाशांपैकी ४२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १ जण नायडू रुग्णालय, पुणे येथे भरती आहे.

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला

दि.६ फेब्रुवारी रोजी पुणे येथील नायडू रुग्णालयात एका चिनी प्रवाशाला विमानात उलटी झाली म्हणून भरती करण्यात आले होते. त्याचा प्रयोगशाळा नमुना निगेटिव्ह आला. परंतु १४ दिवस विलगीकरण आवश्यक असल्याने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत नायडू रुग्णालयात भरती ठेवण्यात आले होते. ११ तारखेला या रुग्णालयातून डिस्चार्ज होताना हा ३१ वर्षीय तरुण अत्यंत भावूक झाला होता. “अचानक मला इथे भरती व्हावे लागले, भाषेचा प्रश्न होता. पण इथल्या डॉक्टर्स आणि नर्सेसनी मला खूप चांगली वागणूक दिली. जेवण, स्वच्छता, उपचार, नर्सिंग काळजी इतकी उत्तम होती की, मी विलगीकरण कक्षात भरती आहे, असे मला वाटलेच नाही.” असा अभिप्राय या अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या तरुणाने नोंदवला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

3 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

4 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

15 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

20 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

24 hours ago