टेस्टिंग कमी | शहरात नवे 59 ‘पॉझिटिव्ह’;चौघांचा मृत्यू या भागातील…

MH13 News Network

शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मध्यंतरी टेस्टिंग कमी असल्याने पॉझिटिव्ह रिपोर्ट कमी येत होते. परंतु साधारणपणे पाचशेच्या वर टेस्टिंग गेल्यास संसर्गित व्यक्तींची संख्या जास्त दिसून येत आहे.
सोलापूर शहर हद्दीत आज शुक्रवारी दि.11सप्टेंबर रोजी कोरोनाचे 59 रुग्ण आढळले असून यामध्ये 36 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 64 इतकी आहे. यामध्ये 39 पुरुष तर 25 महिलांचा समावेश होतो.

बुधवारपासून सोलापूर शहरात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेने ऊत घेतला होता. विशेष म्हणजे व्यापारी,छोटे उद्योग, हातावर पोट असणारे अनेक जणांनी याबाबत धास्ती घेतली होती. परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॉक डाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले.

आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 490 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 431 निगेटीव्ह तर 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7363 असून एकूण मृतांची संख्या 440 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 799 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6124 इतकी आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

26 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago