अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network

सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .अनलॉक सोलापूर मध्ये  वाढणारी संसर्गजन्य रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा दर प्रशासनाची आणि सोलापुरातील नागरिकांची चिंता वाढवत आहे .या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी लागू करावी अशी मागणी जोर धरत आहे ,त्यास काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. अखेर आज या बाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी 216 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 130 अहवाल निगेटिव्ह आले असून  86 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 48 पुरुष तर 38  महिलांचा समावेश होतो .आज  234 प्रलंबित अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज   51 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी नोंद घेण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3161 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण   298 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1114  इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या  1749 इतकी लक्षणीय आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago