‘सुरु’ असलेल्या दवाखान्यांच्या माहितीसाठी ‘कोविड नियंत्रण कक्षा’स करा संपर्क…

सोलापूर, दि. 23 – सोलापूर शहरातील सुरू असलेल्या खाजगी दवाखान्यांची माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 18002335044 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावानंतर सोलापूर शहरातील खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवर ताण येत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरू ठेवावे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी वारंवार चर्चा केली आहे. मात्र मात्र खाजगी दवाखान्यातून रुग्ण सेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारी लक्षात घेता इंडियन मेडीकल असोसिएशनला खाजगी दवाखाने सुरू ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची कोणते दवाखाने सुरू आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी, अशी सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनने शहरात सुरू असलेल्या दवाखान्यांची यादी जिल्हा प्रशासनास सादर केली होती ही यादी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध असून नागरिकांना कोणते दवाखाने सुरू आहे याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातून मिळू शकेल. तसेच सदर दवाखाने बंद असल्यास अथवा रुग्णसेवा मिळत नसल्यास नागरिकांनी जिल्हा कोविड कक्षास संपर्क साधून कोणत्या दवाखान्यात कोणती रुग्णसेवा मिळाली नाही याचा तपशील द्यावा जेणेकरून पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

1 hour ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

1 hour ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

11 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

20 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

21 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago