सोलापूर ,प्रतिनिधी
या निवडणुकीत एमआयएम मुस्लीम मतांचे विभाजन करु पाहात आहे, पण या पक्षाला थारा न देता धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करण्यासाठी कॉंग्रेसला विजयी करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऊर्दू शायर इम्रान प्रतापगढी यांनी शनिवारी सोलापुरात किडवाई चौकात कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे व बाबा मिस्त्री यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले
यावेळी आ. प्रणितीताई शिंदे, माजी महापौर आरिफ शेख, सुशीला आबुटे, चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, रफिक हत्तुरे, जाकीर नाईकवाडी, सलीम सय्यद, हेमा चिंचोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रतापगढी पुढे म्हणाले की, या निवडणुकीतील लढाई ही संविधान वाचविण्यासाठी आहे. तिहेरी तलाकाविषयी केंद्र सरकारने केलेला कायदा म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुगांत टाकण्याचे षडयंत्र आहे. गत 70 वर्षांतील कॉंग्रेसच्या कारभारावर विरोधक टीका करतात, पण या सरकारने केलेल्या चांगल्या कामांविषयी ते बोलत नाहीत.
वास्ताविक अल्पसंख्याकांसाठी कॉंग्रेसचे खूप काही दिले आहे. या निवडणुकीत जातीय भावना भडकाविण्याचे काम केले जाऊ शकते. यामुळे मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे.
याप्रसंगी रफिक बागवान म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणात ज्यांना मोठे केले असे काही लोक या मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. अशांना धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे. कॉंग्रेसने आपल्या राजवटीत दलित, मुस्लीमांना सुरक्षित ठेवले. पण भाजप सरकारची वाटचाल पाहता भविष्यात हुकूमशाही येऊन संविधान बदलण्याचा धोका आहे. तेव्हा नागरिकांनी सारासार विचार करुन मतदान द्यावे.
बिस्मिल्ला शिकलगार म्हणाल्या की, या निवडणुकीत जातीच्या आधारे मतांचे विभाजन न करता प्रणितीताईंनाच निवडून देण्याची गरज आहे. मुसा मुर्शिद म्हणाले की, ज्यांना कॉंग्रेसने दहा हजार घरकूल बांधण्यासाठी मदत केली असे आडम मास्तर 30 हजार घरकुलांच्या प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करीत जर मी निवडून न आल्यास हा प्रकल्प रखडेल अशी लोकांना धमकी देत आहे. अशांना या निवडणुकीत धडा शिकवावा.
याप्रसंगी राजा बागवान, सलीम मिस्त्री, केशव इंगळे, सादीक कुरेशी यांनीही आपले विचार मांडले. सभेला ईस्माईल दलाल, इम्रान सालार, सलीम सय्यद, इम्तियाज अल्लोळी, नजब रंगरेज, शोहेब बागवान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…