काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी मोहोळचे राजेश पवार

0
16

MH13News,network

मोहोळ तालुक्यातील श्री राजेश आप्पा पवार यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व या निवडीचे पत्र मुंबई येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, मोहोळ विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आरिफ पठाण, साईप्रसाद फाऊंडेशनचे बापू पाटील उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here