पराभवाने खचणार नाही, पुन्हा जिंकून दाखवू :आ. प्रणिती शिंदे

काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला निर्धार

0
23

By-MH13NEWS,नेटवर्क

लोकसभा निवडणूक ही विकासाच्या,जनसंपर्काच्या व गोरगरिबांच्या कल्याणाच्या आधारे झाली नाही. परंतु याही परिस्थितीवर काँग्रेस पक्ष सक्षमपणे मात करेल, सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची सेवा केली,कार्यकर्त्यांना ताकद दिली असून आम्ही पराभवाने खचणार नाही, पुन्हा जिंकून दाखवू असा ठाम विश्वास बैठकीत व्यक्त केला.

सोलापूर काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस भवन येथे या भरवण्यात आली होती.त्या प्रसंगी ते बोलत होत्या .या बैठकीस माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, नलिनीताई चंदेले, सुशीला आबुटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, आदी उपस्थित होते.

यावेळी आ.शिंदे यांनी,’ ये सफर बहोत है कठीण, ना उदास हो मेरे हमसफर, ये है अगले मोड पर मंझिल एक, नही रहनेवाली मुश्कीले, मेरी बात पर यकीन कर, ना उदास हो मेरे हमसफर अशी शायरी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर सांगून जोश निर्माण केला.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदार नोंदणी, आरोग्य शिबीर, व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबवावे, येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उभा करू. जातीधर्मावर फूट पाडणाऱ्या विचारांच्या विरोधात आपली लढाई शेवटी सत्याचाच विजय होतो. पुन्हा संघटित होऊन लढू या. सत्ता असो वा नसो सदैव जनतेच्या सेवेत राहू. आम्ही खचणार नाही पुन्हा जिंकून दाखवू असे आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हणाले.
यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माझी खासदार धर्मण्णा सादुल, विश्वनाथ साबळे, केशव इंगळे, NK क्षीरसागर, हसीब नदाफ, देवेंद्र भंडारे, यावेळी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन आझम सैफन तर आभार प्रदर्शन हेमाताई चिंचोळकर यांनी केले.

नगरसेवक रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नगरसेविका फिरदोस पटेल, परविन इनामदार, वैष्णविताई करगुळे, अनुराधा काटकर, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, दत्तू बंदपट्टे, सिद्राम अट्टेलुर, सिद्धाराम चाकोते, जेम्स जंगम, जयश्री शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, मागासवर्गीय अध्यक्ष NK क्षीरसागर, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, ब्लॉक अध्यक्ष महेश घाडगे, संजय गायकवाड, सुमन जाधव, अशोक कलशेट्टी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती

यावेळी राजन कामत, हणमंतू सायबोलू, बसवराज म्हेत्रे, सायमन गट्टू, जाबिर अल्लोळी, नामदेव राठोड, अपासाहेब बगले, पांडुरंग चौधरी, सोहेल कुरेशी, लखन गायकवाड, मल्लिनाथ सोलापुरे, योगेश मार्गम, उमेश कोळी, संजय गायकवाड, अरुणाताई वर्मा, किसन मेकाले गुरुजी, कामरूनिसा बागवान, शाहू सलगर, प्रमिला तुपलवंडे, लता गुंडला, प्रमोद नंदूरकर, AD चीनिवार, अनुपम शहा, रुस्तुम कंपली, अनिल मस्के, मीनाक्षी बंकांपुरे, संघमित्रा चौधरी, संध्या काळे, VD गायकवाड, इसाक पुढारी, राजेश झंपले, चेतमल गोयल, अभिशेक गायकवाड, गुलाब बारड, मन्सूर गांधी, अशोक मादगुंडी, राजेंद्र शिरकुल, भोजराज पवार, चंदप्पा क्षेत्री, दिनेश डोंगरे, शुभम माने, सुभाष वाघमारे, शिवराज कोळी, हारून शेख, उपेंद्र ठाकर, अनिल हिबारे, विश्वास गज्जम, चक्रपाणी गज्जम, शरद गुमटे, मनोज दरेकर, अनिल वाघमारे, नरेंद्र इंगळे, रमेश फुले, दीनानाथ शेळके, रामसिंग आंबेवाले, नागनाथ निंबाळकर, नुरअहमद नालवार, आप्पाजी गायकवाड, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोटठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here