‘या’ काँग्रेसच्या दोन विद्यमान आमदारांची मुलाखतीला दांडी.!

भाजपच्या वाटेवर असल्याची मोठी चर्चा

0
655

By-MH13NEWS,network

नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेल्या आगामी विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखतीला दोन आमदारांनी पाठ दाखवली होती. बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे हे या वेळी अनुपस्थित होते. हाच कित्ता कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी आज गिरवला असल्याची चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात रंगत होती. कॉंग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत सोलापूरात विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. याकडे या दोन्ही विद्यमान आमदारांनी मुलाखतीला दांडी मारली. मागील काही दिवसांपासून हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सोलापुरातील हे दिग्गज असणारे चार आमदार मुलाखतींना अनुपस्थित राहिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भविष्याविषयी शंका निर्माण झाली आहे.आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काही कामानिमित्त मी परगावी असल्याचं सांगितलं यावर अक्कलकोट मधील सोशल मिडिया मधून वेगवेगळा सूर निघत आहे.

आ. भारत भालके यांच्याशी संपर्क होवू शकला नाही .त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज आहे. तर इकडे आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसमधीलच अंतर्गत वादामुळे हॅट्रिक साठी संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीत कधीकाळी बालेकिल्ला असणारा किल्ला ढासळू लागला असल्याचं राजकीय जाणकारांच म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here