ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480

सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील दाखले हे संबंधित व्यक्तींना दिले जातात. परंतु काही दिवसांपासून येथील जन्म-मृत्यू नोंदणी विभाग हा झोन कार्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याने नागरिकांची मोठी ससेहोलपट होत आहे.त्यामुळे सामान्य नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते.

कोरोना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने जन्म-मृत्यु नोंदणी साठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले होते.त्यास नागरिकांनी काहीशा प्रमाणात प्रतिसाद दिला होता परंतु गेल्या महिन्यात महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार जन्म-मृत्यू नोंदणी झोन कार्यालयात करण्यात आली आहे. हुतात्मा स्मृती मंदिर जवळील एका खोलीवजा कार्यालयामध्ये जन्म-मृत्यू नोंदीचे अर्ज स्वीकारले जात आहेत.तर झोन कार्यालयामध्ये त्या संदर्भातील दाखल्यांचे वितरण केले जाते.यामुळे अर्ज एका ठिकाणी आणि दाखले घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी असा सावळा गोंधळ निर्माण झाला असल्याची टीका नोंदणीसाठी येणारे नागरिक करत आहेत.

साधारणपणे सुट्टीचा दिवस वगळता दररोज 500 ते 600 जन्म-मृत्यू नोंदणी अर्ज येतात. यामध्ये दुरुस्ती, स्पेलिंगच्या चुका, घरी झालेल्या जन्म नोंदणी, घरी झालेल्या मयत नोंदणी यांचा समावेश आहे. तर दिवसातून पाचशे ते सहाशे दाखले नागरिकांना दिले जातात.

याबाबत मी लगेच आयुक्तांना सूचना करेन…
जन्म- मृत्यू नोंदीसाठी अनेक नागरिक महापालिकेत येत असतात. मागील महिन्यापासून येथे नोंदणी होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांची धावपळ होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे हे लक्षात घेऊन प्रशासनाने आधी प्रमाणे कामकाज सुरू करावे.किमान एक खिडकी योजनेप्रमाणे काम सूरु झाल्यास नागरिकांची धावपळ कमी होईल.याबाबत आजच आयुक्तांना लेखी सूचना करेन.
श्रीकांचना यन्नम
महापौर

कोरोना काळात सोशल डिस्टन्स राखण्यासाठी जन्म- मृत्यू नोंद शहरातील झोन कार्यालयात सुरू करण्यात आले. परंतु ज्यांना याची माहिती नाही. त्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ होत आहे. झोन कार्यालय शोधण्यामध्ये त्यांचा वेळ जात आहे .पर्यायाने कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद घडताहेत. आयुक्तांनी तातडीने या प्रश्नी लक्ष घालून किमान एक खिडकी महापालिकेच्या आवारात सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी मी आजच पाठपुरावा करतो.
अमोल (बापू) शिंदे
विरोधी पक्षनेता

सकारात्मक आहोत…लवकरच निर्णय..!!

आजच्या घडीला शहरातील आठ ठिकाणी झोन कार्यालयात जन्म- मृत्यूच्या नोंदी घेतल्या जातात. कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आयुक्तांनी नागरिकांची सोय व्हावी आणि लवकर जन्म-मृत्यू नोंदीचे दाखले मिळण्यासाठी झोनमध्ये व्यवस्था केली आहे. परंतु अनेक नागरिकांना याची माहिती नसल्यामुळे ते पुन्हा महापालिकेतच येत आहेत. एक खिडकी सुरू करून त्यातून जन्म-मृत्यू नोंदणीचे अर्ज स्वीकारणे आणि दाखले देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. आयुक्तांशी बोलून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.
धनराज पांडे, मनपा उपायुक्त

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

9 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

11 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

14 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

1 day ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago