डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक घटनांना वाव द्या : कुलगुरू

MH13NEWS Network

सोलापूर- आज सर्वच क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. ऑनलाईनमुळे स्पर्धा वाढली आहे. पत्रकारिता क्षेत्रातही डिजिटल पत्रकारितेचा उदय झाला आहे. डिजिटल पत्रकारिता करत असताना पत्रकारांनी समाजातील सकारात्मक गोष्टींना वाव देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर पत्रकारांनी महत्वाच्या घटना घडामोडींचे चांगले विश्लेषण करावे. नेहमी आपले लिखाण गुणवत्तापूर्वक ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल पत्रकारिता आणि समाजमाध्यमे’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर हिंदुस्तान टाईम्सचे संपादक विश्वनाथ गरुड, शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. निशा पवार, मास कम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, सुसंवाद माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजित बिराजदार यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पत्रकारिता विभागामार्फत आयोजित करणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, ऑनलाइनच्या युगात सर्वांनाच आता ऑनलाइनतज्ञ असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. त्यावेळीच त्या गोष्टी आपणास सोप्या वाटतील. डिजिटलमुळे गती आली आहे. मात्र या स्पर्धेत गुणवत्ता टिकणे फार आवश्यक आहे. पत्रकारांनी स्पर्धेच्या युगात आपली मूल्ये जोपासली पाहिजेत. शास्त्रशुद्ध घटना घडामोडींचे विश्लेषण केले पाहिजे. मात्र हे करत असताना सकारात्मक गोष्टींना अधिक जागा देणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विकास आणि प्रगती होण्यास वेळ लागणार नसल्याचे प्रतिपादनही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.

याप्रसंगी डिजिटल पत्रकारिता याविषयी बोलताना गरुड म्हणाले की, या क्षेत्रामध्ये प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी आपली मातृभाषा चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे व अशी निर्मिती कशा पद्धतीने करावे, त्यात निर्णय घेतले पाहिजे. बातम्या वेगळ्या पद्धतीने हवे आहेत, माहिती वेगळ्या पद्धतीने हवी आहे ते तंत्र विद्यार्थ्यांनी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले. दुपारच्या सत्रात योगेश बोराटे यांनी समाज माध्यमे कशा पद्धतीने काम करतात, याविषयी मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे संतोष पवार, हर्षल अकुडे यांनी देखील यात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील विद्यार्थी प्राध्यापक तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील विद्यार्थी तसेच पत्रकार सहभागी झाले होते. या कार्यशाळेस सुसंवाद या माजी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी मानले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

2 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

13 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

18 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

22 hours ago