Categories: राजकीय

बुधवार पेठ बस डेपोची जागा सीएनजी पंपास देऊ नये ; सुरेश पाटील

by-MH13 NEWS NETWORK

सोलापूर महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने बुधवार पेठ येथील बस डेपोच्या पाच एकर जागेपैकी एक एकर जागा सीएनजी पंपासाठी 29 वर्ष अकरा महीने कराराने भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घालण्यात आला आहे परंतु या परिसरातील असलेल्या लोकशाही आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती, बुधवारपेठ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, महेश काँलनी, प्रभाकर महाराज मंदिर,चंडक काँलेज अशा दाट लोकवस्तीचा विचार करून ही जागा सीएनजी पंपासाठी देऊ नये अशा आशयाचं पत्र भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालिका आयुक्त दीपक तावरे यांना दिले आहे.

महापालिका परिवहन उपक्रमाच्या बुधवार पेठ येथील पाच एकर जागेपैकी एक एकर जागा सीएनजी पंपा करिता आय.एम.सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 29 वर्षे 11 महिने कराराने प्रतिमहा तीन लाख 19 हजार रुपये भाडेकराराने देण्याचा घाट परिवहन समितीने घातलेला आहे. या कंपनीमार्फत पाइपलाइनद्वारे प्रत्येक घरांना गॅस पुरवठा करणे तसेच वाहनांमध्ये गॅस भरणे यासाठी या कंपनीला बुधवार पेठ येथील जागा देण्यात येणार आहे.या भागात
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती, बुधवारपेठ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, महेश काँलनी, प्रभाकर महाराज मंदिर,चंडक काँलेज, गुरुद्वारा अशा मध्यवर्ती लोकवस्ती असलेल्या ठिकाणांची जागा असल्याने या ठिकाणी जर सीएनजी पंप चालू केला तर ते जनतेच्या हिताचे नसणार आहे. भोपाळ सारखी एखादी मोठी दुर्घटना या परिसरात घडल्यास मोठी वित्त व जीवित हाणी घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती असलेल्या बुधवार पेठ बस डेपोची जागा सीएनजी पंपासाठी न देता या जागेत महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवून कर्मचाऱ्यांना येथे घरे उपलब्ध करून द्यावी आणि सीएनजी पेट्रोल पंपा साठी बुधवारपेठ ऐवजी शहराच्या बाहेर जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी.

बुधवार पेठ बस डेपो येथे बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतून महापालिकेला मोठ्या प्रमाणात कररूपी उत्पन्न मिळणार आहे तेच उत्पन्न परिवहन उपक्रमास मदत स्वरूपी देण्यात यावे त्यामुळे परिवहनला आर्थिक मदत देखील होईल. त्यामुळे बुधवार पेठ येथील बस डेपोची जागा आणि येथील लोकवस्तीचा विचार करता ही जागा सीएनजी पंप करिता आय एम सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देऊ नये असं निवेदनात सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे त्यामुळे पाटील यांच्या निवेदनावर पालिका आयुक्त दीपक तावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

Breaking -ट्रॅव्हलर, सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

धक्कादायक मोहोळ विजापूर हायवे वरील घटना मोहोळ विजयपूर महामार्गावर येथे विजयपूर कडे व्हीआयपी सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग…

1 day ago

राज्यासाठी ठाकरे सरकारची पंतप्रधान मोदींकडे ही ‘मागणी’

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा…

2 days ago

माजखोर ‘वारिस’ तुझे 15 कोटी लोक घेऊन….

MH13NEWS Network एमआयएमचे वारिस पठाणच्या प्रतिमेला 'प्रहार'ने काळ फासलं आम्ही १५ कोटी मुस्लिम १३५ कोटी हिंदूवर भारी असल्याचे वादग्रस्त विधान…

2 days ago

‘यल्लोरु अप्पा बेडर शिवभक्त कन्नप्पा’…जयंती भक्तिभावात…

MH13NEWS Network महाशिवरात्री म्हणजेच सृष्टी दिन याच दिनी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे अख्यायिका मध्ये…

2 days ago

#शिवमय : महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर ‘भक्तीसंगम’

शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर फुलले सोलापूर, दि.21 फेब्रुवारी - महाशिवरात्रीनिमित्त कुडल संगम (दक्षिण सोलापूर) येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.…

2 days ago

या पुढे…राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज.!

मुंबई, दि. १७ राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून याविषयी चर्चा…

2 days ago