मकर संक्रमणानिमित्त स्वामींच्या चरणी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवा संपन्न

MH13 NEWS NETWORK:

अक्ककोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त येथील एम.ए.बी.एड.संगीत अलंकार पदवीधर मनोहर देगावकर यांनी मकर संक्रमणाच्या पुण्यपर्वासमयी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवेतून श्रोत्यांना मकर संक्रांतीची गोड भेट दिली. मंदिरातील ज्योतिबा मंडपात पार पडलेल्या या गायन सेवेत मनोहर देगावकर यांनी पहाटे ५ ते सकाळी ८ व सकाळी १० ते सकाळी ११ :३० या दोन सत्रांमध्ये शास्त्रीय गायनाच्या भैरवी रागातील बडा ख्याल व छोटा ख्याल तसेच राग सारंग छोटा ख्याल इत्यादी शास्त्रीय गायनातील विविध कलाविष्कारांचा नजराणा सादर केला.

या गायन सेवेत देगावकरांनी राम का गुणगान, बोलावा विठ्ठल, स्वामी समर्थांचे अभंग, मज भेटुनी जा हो दत्त सखा, संत संगतीने संत दर्शनाचा लाभ घ्यावा इत्यादी अभंगही त्यांनी याप्रसंगी सादर केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर आनंद पाटील यांनी साथ संगत केली. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, चित्तरंजन अगरथडे, बंडेराव घाटगे, विजयकुमार कडगंची, सचिन पेठकर, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, रवीराव महिंद्रकर, काशिनाथ इंडे, विपुल जाधव, स्वामीनाथ लोणारी, जयसिंह इंगळे, महादेव तेली, सचिन हन्नुरे, संजय पवार, गिरीश पवार, प्रसाद सोनार, नागनाथ गुंजले, महेश मस्कले, महेश काटकर आदींसह अनेक भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

22 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago