सोलापूर | ‘या’ चिमुकलीची अनोखी राखी पौर्णिमा

म्हणतात ना लहान मुलांच्या भावविश्वात नेमकं काय सुरू असेल कोणालाही नाही सांगता येणार..! असंच काहीसं म्हणावं असं  सोलापुरातील एका चिमुकल्या मुलीने आजच्या शुभ दिवसाचे औचित्य साधून अनोखी राखी पौर्णिमा साजरी केली.

झाडं, पानं, फुलांबद्दल ‘गाथा’च्या इवल्याशा मनात खूप मोठं कुतूहल. हे झाड छोटं का? ते कधी मोठं होणार? त्याचं पान छोटं अन् याचं केवढं मोठं? ते हार्टशेप, हे लांब, या पानांची कटिंग देवबाप्पा करतो का? या तिच्या रोजच्या बालसुलभ भाबड्या प्रश्नांना उत्तर देताना आई-बाबांची पुरती दमछाक होते. तरीही अगदी आनंदाने तिचं कुतूहल वाढवण्यात आमचे आई- बाबा खूप सजग असतात. देवपूजा करताना तुळस, बेलपत्री, दुर्वा, आघाडा, आंब्याची पानं दाखवून त्या प्रत्येकाचं वेगळेपण दररोज गाथाला सांगताहेत. कधी आंब्याच्या पानांचं तोरण करायला शिकवून तरी कधी पानांचा विडा करून.

आजही असच राखी पौर्णिमा निमित्ताने घडलं, झाडांच्या बिया अन् कडधान्यापासून राखी तयार करण्याची अफलातून कल्पना सौ. केतकीने मांडली. अन् मग काय, गाथा लागली कामाला. लगेच सगळ्या डाळी, कडधान्य काढली. चहाच्या बॉक्सवर आकार काढून त्या भोवती कडधान्य, फुलांच्या बियांची सजावट केली. तेव्हा साकारली एक नैसर्गिक राखी. गाथाने मनापासून ते केलं. राखी तयार झाल्यावरची तिच्या डोळ्यातली चमकच सांगत होती तिच्या मनाचं समाधान. नवनिर्मितीचा, सृजनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
आज (सोमवारी ) वाड्याच्या मागील परसबागेतील झाडांना राखी बांधण्यात आली. गाथाने तिच्या आवडीच्या शेवगाच्या झाडाला राखी बांधली. मनापासून त्यास औक्षण करून रोपाला मिठी मारली. तिच्या समवेत सौ. आई व सौ. केतकी यांनी झाडांना राखी बांधली.अशी प्रतिक्रिया ‘रानवेध’चे विनोद कामतकर यांनी व्यक्त केली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

9 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago