बाल दिंडी सोहळा उत्साहात साजरा

राजीव प्राथमिक शाळा व शरद बालक मंदिराचा संयुक्त उपक्रम

0
42

by-MH13 NEWS,नेटवर्क 
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बाळे संचलित राजीव प्राथमिक शाळा व शरद बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढून सोहळा साजरा करण्यात आला.

या दिंडी सोहळा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री किशोर पाटील तर प्रमुख उपस्थिती इन न्यूज प्रमुख श्री समाधान वाघमोडे,. प्राचार्य ज. रा. चंडक प्रशालेचे श्री. घोडके, इंदिरा कन्या प्रशालेच्या श्रीमती चराटे हे उपस्थित होते.

 

बालगोपाळांनी विविध संतांची, राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा केली होती. सर्व बालगोपाळ वारकरी वेश परिधान करून आले होते. अतिशय उत्साही वातावरणात दिंडी निघाली यावेळी उंट व घोड्यांची खास विशेष आकर्षण होते. मुख्याध्यापक श्री आतकरे व शरद बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here