Categories: सामाजिक

छावा क्रांतिवीर सेनेने जपली सामाजिक बांधिलकी ; कोविड योद्ध्यांचा केला सन्मान

MH13 News Network
छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य,सोलापुर जिल्हा व शहर यांच्या कडून अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त पत्रकार व परिचारिका यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह शिवाजीराव कांचन-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष महिला आघाडीच्या प्रगती तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेचे सर्व जिल्हा व शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या
कुंदन ताकमोगे- जिल्हाध्यक्ष युवक आघाडी सोलापूर विभाग, शीतल मोरे- शहर कार्याध्यक्ष,अश्विनी सुरवसे- शहर उप-कार्याध्यक्ष, करिश्मा शिंदे- मोहोळ तालुका युवती संघटक ,ज्योती कांबळे- मोहोळ तालुका अध्यक्ष ,मिनाक्षी भगरे- उत्तर तालुका अध्यक्ष
अभिजित काकडे- मोहोळ तालुका अध्यक्ष वाहतूक आघाडी ,सोनाली पाटील बाळीवेस विभाग प्रमुख
या सर्व नूतन कार्यकर्त्यांचा पद देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानंतर कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये स्वतःची व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता पत्रकार बंधू, परिचारिका , मेडिकल व पॅरा मेडिकल स्टाफ,पोलीस बांधव, सफाई कामगार,आशा वर्कर जे सातत्याने रोज काम करतात अश्या सर्व योध्याचा कोविड योद्धा म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

सन्मानित पत्रकार विकास कस्तुरे-दैनिक पंढरी भूषण, महेश हणमे-MH 13 न्यूज, वैभव गंगणे-K सिटी न्यूज, विशाल सपकाळ-दैनिक लोकप्रधान,मोहन कोळी-दैनिक सकाळ, भरतकुमार मोरे-उपसंपादक पुण्य नगरी, मकरंद ढोबळे-स्वराज्य न्यूज मराठी,अण्णासाहेब पवार-दैनिक पुढारी,शिवाजी सावंत- स्टार tv9,सुनील कोडगी- लाईव्ह सोलापुर,अभिषेक आदेप्पा-डीपी न्यूज,परिचारिका शितलताई मोरे,परिचारिका रेणुकाताई करडे,युसूफ पिरजादे- sp इंडिया न्यूज,परमेश्वर अवताडे- साप्ताहिक नवदूत, मराठा न्यूज च्या संपादिका स्मिता ताई चव्हाण या सर्वांना कोविड योद्धा म्हणून केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस केंद्रीय व प्रदेश कार्यकारणी कडून शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रम पार पडण्यास सर्व जिल्हा व शहर पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

1 hour ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago