Categories: सामाजिक

हिप्परगा तलावात पाणी सोडण्यासाठी छावाचे आमरण उपोषण

By-MH13News,नेटवर्क

सोलापूर -: शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ व उजनी धरणातुन हिप्परगा तलावात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11:00 वाजलेपासून राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष श्री. रतिकांत पाटील हे लोकशाही मार्गाने हिप्परगा तलावातील पाणवठा येथे बेमुदत आमरण उपोषणास बसलेले असून हिप्परगा तलावात पाणी आल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा ठाम निश्चय उपोषणकर्ते आणि छावा संघटनेने केलेला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की.., हिप्परगा तलावाची क्षमता दोन टीएमसी असून सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा, हगलूर, भोगाव, बाणेगांव, राळेरास, मार्डी, तरटगांव, एकुरगे, ऊळे व दक्षिण सोलापुरातील चौदा गावातील पाणी पुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून हिप्परगा तलावात पाणीच नाही. तसेच हिप्परगा तलावातील पाणी संपल्याने कित्येक महिन्यांपासून तलावातुन होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यंदा पावसाला संपत आला तरीही अद्याप तलाव कोरडाच आहे.
त्यामुळे सोलापूर शहर आणि उत्तर व दक्षिण तालुक्यातील दुष्काळी गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी उजनी धरणातुन डाव्या कालव्यातून कारंबा शाखेला सोडलेले पाणी पंपिंग करून कॅनॉलव्दारे हिप्परगा तलावात पाणी सोडावे, यासाठी छावा संघटनेने सातत्याने प्रशासकीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करूनही यावर योग्य ती कार्यवाही झालेली नाही. डाव्या कालव्यातून कारंबा शाखेच्या कॅनॉलचा टेलएंड हिप्परगा तलावाजवळ आहे. तसेच टेल टु हेड असे पाणी सोडण्याचा नियम असतानाही शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या भ्रष्ट कारभारामुळे हिप्परगा तलावात टेल टु हेड प्रमाणे कधीच पाणी आले नाही.
त्यामुळे शासकीय प्रशासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ व उजनी धरणातुन हिप्परगा तलावात तातडीने पाणी सोडावे यासाठी दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी ठीक – 11:00 वाजलेपासून राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष श्री. रतिकांत पाटील हे लोकशाही मार्गाने हिप्परगा तलावातील पाणवठा येथे बेमुदत आमरण उपोषणास बसलेले असून हिप्परगा तलावात पाणी आल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा ठाम निश्चय संघटनेने केलेला आहे.


यावेळी उपोषणकर्ते रतिकांत पाटील यांना प्रोत्साहन व साथ देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, कार्याध्यक्ष संजय पारवे, अविनाश पाटील, कुमार भिंगारे, चंद्रकांत सुरवसे, दादा सुरवसे, नागनाथ काटे, शशी शिंदे, उमेश भगत, सुजीत उंबरे, पिंटू कापसे, युवराज पवार, शरद काटे, गणेश मोरे, निलेश मोरे आणि संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago