अनोखा फ्रेंडशिप डे : निसर्गाशी मैत्री जोडून केला पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

अणदुर/प्रतिनिधी
आज चन्नबसव सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. निसर्गाशी मैत्री धागा मैत्रीचा ध्यास पर्यावरण संवर्धनाचा हा अनोखा उपक्रम अणदुर येथे राबविण्यात आला. यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व व निसर्ग संवर्धन ही काळाची गरज बनली असून त्याचे महत्त्व सांगून त्यांना रोपटे भेट देऊन फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला.

यावेळी संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली. रक्ताच्या नात्याच्या पलीकडील निसर्गाशी मैत्री करण्याचे आवाहन यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर तिरगुळे यांनी केले.संस्थेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशोत्सव, वसुंधरा दिन,पर्यावरण दिन,एक विद्यार्थी एक वृक्ष ,एक डॉक्टर एक वृक्ष,एक व्यापारी एक वृक्ष हे पर्यावरण पुरक कार्यक्रम राबविल्या ची माहिती दिली.

यावेळी अ.भ.वि.प.चे जिल्हा कार्यालय मंत्री अंकुश चिनकरे ,केदार पाटील, मारुती सोनटक्के, प्रशांत सुरवसे,वैभव घोडके, निखिल पवार,मनोज चेंडके,महेश गाढवे,महादेव निर्मळे,आदी विद्यार्थ्यांना रोपटे देऊन वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संपत वाघे, विरकुमार नरे,संगमेश्वर तिरगुळे,गुणवंत मुळे,आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago