आजपासून किरनळ्ळी येथील चंद्रादेवींच्या याञेला प्रारंभ

0
3

By- धोंडप्पा नंदे,MH13NEWS

अक्कलकोट तालुक्यातील किरनळ्ळी गावात आज पासून नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या चंद्रा देवीच्या याञेला सुरवात होत आहे. सालाबादप्रमाणे किरनळ्ळी येथे चंद्रादेवीची यात्रा आज ९मार्चपासून सुरवात होत आहे.
आज सायंकाळी चंद्रादेवीची पालखी व घोडा भुरीकवठेला सुतार यांच्या घरी मुक्कामाला जाते. तिथे भुरीकवठेला रात्री देवीचे जागर विविध पारंपरिक कार्यक्रम होतात दुसऱ्या दिवशी रविवारी दि.10 मार्च रोजी रोजी दुपारी देवीची पालखी परत किरनळ्ळी येते. गावातील लोकानी व महिलांनी पुरण पोळीचा नैवेद्य देवीस अर्पण करण्यात येते. तिसऱ्या दिवशी सोमवारी 11मार्च रोजी दुपारी 12 वाजता देवीचे रथ अतिशय भक्तिमय वातावरणात भाविकांकडून ओढण्यात येतो. सायंकाळी 4 वाजता जंगी कुस्ती व शोभेचे दारुकाम होते. व रात्री 10 वाजता मराठी नाटक पैशाची कमाल बाईची धमाल हे मनोरंजन करण्यासाठी नाटक ठेवण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व देवी भक्तांनी व गावातील बंधू -भगिनींनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समिती कडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here