Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम प्रशासन हाताळत असल्याचे सिद्ध केले.

यांच्यावर केली कारवाई…
वि.का. मसरे, उपशिक्षक जि.प.प्रा.शाळा लक्ष्मीदहिवडी ता. मंगळवेढा येथे कार्यरत असताना त्यांच्यावर भा.दं.वि. ३७६ (२), (आय), ३७६ (एफ) बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५ (एफ) ५ (एम) ६,४, ९.१० अन्वये प्राप्त अहवालानुसार दिनांक ७ मे २०१६ रोजी निलंबित करण्यात आलेले होते. श्री. मसरे यांनी दोषारोपातील आरोप अमान्य केल्याने चौकशी सुरु केले. श्री. मसरे हे तुरुंगात असल्याने विभागीय चौकशीच्या तारखेस अनुपस्थित राहिल्याने विभागीय चौकशी तहकुब करण्यात आलेले होते. श्री. मसरे यांना पंढरपूर न्यायालयाने यांचेकडून न्यायनिवाडा होऊन मसरे यांचेवर आरोप सिध्द झाल्याने १० वर्षे शिक्षा व दहा हजार द्रव्यदंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष वाढीव अशी शिक्षा सुनावण्यात आल्याने खुलाशासाठी नोटीस दिल्यानंतर १० दिवसाची मुदत संपल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार ४ (७) मधील तरतुदीनुसार मा. श्री. दिलीप स्वामी, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी श्री. वि.का. मसरे, उपशिक्षक जि.प.प्रा. शाळा लक्ष्मीदहिवडी ता. मंगळवेढा यांना आज रोजी जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ केले.
या ग्रामसेवकास केलं निलंबित…

ए.आर. उंबरजे, ग्रामसेवक हे पंचायत समिती, मोहोळ गटाकडील ग्रामपंचायत मौजे शिंगोली / तरटगाव येथे कार्यरत असताना गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांचेकडील अहवालानुसार ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज करणे, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणे, लेखासंहिता २०११ नुसार ग्रामपंचायतीचे दप्तर अद्यावत न करणे, ग्रामपंचायतीचे सजेमध्ये अनाधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे आदी गैरशिस्तीचे वर्तन केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ मधील तरतुदीनुसार मा. श्री. दिलीप स्वामी, भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी श्रीम. ए.आर. उंबरजे ग्रामसेवक, पंचायत समिती, मोहोळ यांना आज रोजी जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आदेश | रात्र संचारबंदी वाढली ; 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खेळाचे सामने,यात्रा…वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी सोलापुर जिल्ह्यात…

9 hours ago

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय ‘लोक अदालत’

MH13NEWS Network महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक…

11 hours ago

वटवृक्ष देवस्थान म्हणजे मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – जाधव

MH13NEWS Network एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते.…

14 hours ago

महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी: काल उपळाई (बु) येथील शितोळे वस्तीच्या डिपीचे दुरूस्तीचे काम करत असताना…

1 day ago

सोलापुरातील ‘या’ 23 गावांची होणार ड्रोनद्वारे मोजणी ; ग्रामस्थांना होणारे फायदे…

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती             सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन…

3 days ago

मुळेगावात तरुणाचा खून ; १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरुणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या १२…

3 days ago