सोलापूर महानगरपालिकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0
11

By-MH13NEWS,वेबटीम

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा 59 वा व सोलापूर महानगरपालिकेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आज महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आयुक्त दिपक तावरे यांनी शहरवासीयांना संबोधित करताना म्हणाले कि, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे. अत्यंत जुनी महानगरपालिका म्हणून नावारुपास आलेली असुन भविष्यात भारतात नांव होण्याच्या दृष्टीने चांगले कामकाज करुया. नगरसेवा हीच ईश सेवा या महापालिकेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे म.न.पा.अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्षमतेने कार्य करावे असे मी आवाहन करतो. तसेच जनसेवा करताना महापालिकेतील कर्मचा-यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत असुन ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यावेळी आयुक्तांनी सर्व शहरवासियांना व कर्मचा-यांना महाराष्ट्र राज्याच्या दिनाच्या ,कामगार दिनाच्या व महापालिका वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या

या गुणवंतांचा केला सन्मान
तसेच महानगरपालिकेतील विविध खात्यातील उत्कृष्ट काम करणा-या गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्रक , स्मृतीचिन्ह देऊन मा.महापौर ,मा.आयुक्त व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारात सर्वश्री खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नांवे

नांव- पदनाम -खात्याचे नांव

श्री.प्रभाकर सिद्राम बनसोडे कायम मजूर उद्यान विभाग

श्री.एच.आर.मुजावर अवेक्षक नगर अभियंता.

सौ.तेजस्विनी बाबुराव कासार क.श्रे.लि.वि.का.क्र.8

सत्यभामा प्रकाश भालेराव झाडुवाली वि.का.क्र.5 प्र.क्र.50

श्री.अशोक नरसोजी खडके मजूर ,महापौर कार्यालय.

श्री.एस.टी.महिंद्रकर व.श्रे.लि. कर आकारणी

श्री.सुभाष ज्ञानू पवार ड्रेनेज बिगारी सार्व.आरोग्य अभियंता.

श्री.त्रिंबक अंबादास ताटे हवालदार,आयुक्त कार्यालय

श्री.नागराज जंबय्या रातलु सफाई कामगार,वि.का.क्र.8

श्री.दत्तात्रय दगडू गायकवाड शिपाई ,अन्न व परवाना विभाग

श्री. व्हनमाने सतिश सिध्दू आरोग्य निरिक्षक, वि.का.क्र.2 प्र.क्र.19

श्री.नडीमेटला वासुदेव मल्लेशम आरोग्य निरिक्षक,वि.का.क्र.2 प्र.क्र.18

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, मा.उप.आयुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील, शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी सुधा साळुंके, नगर अभियंता संदीप कारंजे, मुख्यलेखापाल गिरीष धनवे, मुख्यलेखापरिक्षक अजयसिंग पवार, सार्व.आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, सहा.संचालक नगर रचना लक्ष्मण चलवादी, विजय राठोड, नगर सचिव प्रविण दंतकाळे, नगरसेवक आनंद चंदनशिवे,मुख्य सफाई अधिक्षक संजय जोगदनकर, अग्निशामकदल प्रमुख केदार आवटे, अंतर्गत लेखापरिक्षक अविनाश मोहिते, आयुक्तांचे स्विय सहाय्यक कुलकर्णी, अधिक्षक भुमी व मालमत्ता, सारिका अकुलवार, संगणक प्रोग्रामर सौ.स्नेहल चपळगांवकर , विभागीय अधिकारी मोहन कांबळे, प्रदिप जोशी आदीसह बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व सुत्र संचालन जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here