10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network

सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की…

रविंद्र अप्पासाहेब भोपळे( वय ४६) यांची वैष्णवी प्लाझा, डी मार्ट येथे खुली जागा आहे. सदर जागेबाबत भोपळे यांनी सुनील पोतदार यांच्या विरुद्ध दावा दाखल केला आहे.
सोमवार दि. १८ रोजी रवींद्र भोपळे हे आपल्या शेतात असताना सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांनी रवींद्र भोपळे यांच्या जवळ येऊन डी -मार्ट येथील खुल्या जागेत टपरी वगैरे लावू नका, नाहीतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देऊन गेले होते.
यावेळी राजेश काळे, रवी व्हनकुळे व इतर तीन जणांनी, भोपळे यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. दहा लाख रुपये दे नाहीतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन धक्काबुक्की केली, यादरम्यान भोपळे यांची ७ तोळे वजनाची सोन्याची चेन काढून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. राजेश काळे, रवी व्हनकुळे व इतर तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे हे करत आहेत.
परस्परविरोधी फिर्याद…

जुळे सोलापूर वैष्णवी हॉटेल समोरील तेरा हजार स्क्वेअर फूट जागेपैकी काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. ती जागा मूळ मालकाला न विचारता अनेक दुकानदारांना भाडेतत्त्वावर दिली. याचा जाब विचारताना सहा जणांनी मिळून राजेश दिलीप काळे (रा. गॅलक्सी अपार्टमेंट जुळे सोलापूर) यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन पळवली आहे. रवी भोपळे, संतोष पवार,व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2019 मध्ये सुनील पोतदार यांनी नवीन सिटी सर्वे नंबर  (153 -154 -1) जवळील हॉटेल वैष्णवी समोरील तेरा हजार स्क्वेअर फूट जागा पॉवर ऑफ ऍटर्नी करारानुसार उपमहापौर काळे यांना दिली आहे. ती जागा विकसित करण्याची मुभा आहे असे असताना चौघांनी अतिक्रमण केल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago