‘बाबा’ लगीन ..! कथा सांगायला आले अन् विवाहितेला पळवून नेले…

MH13NEWS Network

भंडारा : भागवत सप्ताहासाठी आलेल्या महाराजाने चक्क गावातील तरुण विवाहित महिलेला पळवून नेल्याची घटना नजीकच्या मोहदुरा येथे घडली. तीन बायकांचा दादला असणारा हा दिनेशचंद्र मोहतुरे महाराज सावनेर तालुक्‍यातील कुबाडा येथील निवासी आहे.

मोहदुरा येथे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत करण्यासाठी सावनेर तालुक्‍यातील कुबाडा येथील दिनेशचंद्र मोहतुरे या तथाकथित हभप महाराजाला बोलविण्यात आले होते. भागवत सप्ताह आटोपताच दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी (ता.5) त्याने गावातील एका तरुण विवाहित महिलेसह पलायन केले.यामुळे गावात मोठी खळबळ माजली होती.

विशेष म्हणजे, ही महिलासुद्धा एका पाच वर्षाच्या मुलीची आई आहे. दिनेशचंद्र नामक हा महाराज मागील वर्षीसुद्धा मोहदुरा येथे भागवत सप्ताह करण्यासाठी आला होता. महाराज अंदाजे 35 च्या वयोगटात आहे. तरुणतुर्क असणाऱ्या महाराजाची देहबोली, गोडगोड बोलण्याने गावकऱ्यांना भुरळ घातली. त्यामुळे त्याला यावेळीसुद्धा भागवत कथा करण्यासाठी बोलविण्यात आले होते.

महाराज सोशल मीडियावरसुद्धा तितकाच ऍक्‍टिव्ह होता. फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर नेहमीच असायचा. त्याच्या गोडबोल्या स्वभावामुळे त्याने गावकऱ्यांशी जवळीक वाढविली होती. गावांत लग्नसोहळा एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याचा मॅसेज टाकला तरी दिनेशचंद्र महाराज गावात हजेरी लावत होता. पलायन केलेल्या विवाहितेच्या सासऱ्याशी त्याने चांगलीच जवळीक साधली होती. एकदोन वेळा त्याने त्यांच्या घरी मुक्काम सुद्धा केल्याची माहिती आहे. अशातच त्याने विवाहितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतले. अन भागवत सप्ताह संपताच त्याने विवाहितेला घेऊन पळ काढला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

1 hour ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago