By MH13NEWS Network
बीएसपी अक्कलकोट विधानसभा उमेदवार नागमूर्ती कुरणे यांच्यावर गुन्हा दाखल
अक्कलकोट तालुक्यात माणूसकीला काळिमा फासणारी घटना
सख्ख्या भावानेच केला बहिणीवर वारंवार बलात्कार
अक्कलकोट तालुक्यातील खैराट गावांत माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली असुन जीवे ठार मारण्याची धमकी देत सख्या भावानेच बहिणीवर वारंवार बलात्कार केला असल्याची गंभीर घटना घडली आहे.
नागमूर्ती कुरणे असे या आरोपी भावाचे नाव असून ही घटना खैराट येथे घडली आहे .गेल्या सहा वर्षांपासून आजपर्यंत सतत हा निंदनीय प्रकार घडत असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून आरोपी नागमूर्ती कुरणे याच्या विरोधात भादंवि कलम ३७६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. नागमूर्ती कुरणे याने आपल्या पेक्षा वयाने मोठी असलेल्या स्वतःच्या बहिणी सोबत 2014 पासून धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले होते. बहीण या गोष्टीस तयार होत नसल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी कुरणे देत असे.
बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे संपुर्ण अक्कलकोट तालुका हादरला आहे व एकच खळबळ उडाली आहे.बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्या मुळे सर्वत्र या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात असून आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी महिला करत आहेत.
नागमूर्ती कुरणे हा स्वतःला स्वयं घोषित भिक्कु म्हणवून घेतो.भिक्कुचे वस्त्र ही तो अंगावर घालून वावरत असतो अशी ही माहिती त्याच्या गावातुन मिळाली. त्याने अलीकडेच झालेली विधानसभा निवडणुक लढवली होती.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…