Breaking ! प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात केला प्रवेश ; मुख्यमंत्र्यांनी दिले ‘असे’ आश्वासन…

पंढरपूर (सोलापूर) : भाविकांसाठी राज्यातील मंदिरे खुली करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर पंढरपुरात प्रवेश केला. विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असून शासनाने आम्हाला मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अखेर प्रशासनाने त्यांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिली. सोबत काही मोजक्‍या जणांसह ऍड. आंबेडकरांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेलं विठ्ठल मंदिर अखेर उघडण्यात आलं. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी वारकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी वारकऱ्यांना खुले करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने आज सोमवारी आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात प्रमुख महाराज मंडळींसह शेकडो वारकरी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दाखल झाले होते . या वेळी ऍड. प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, अशोक सोनोने, रेखा ठाकूर, तुकाराम महाराज भोसले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी,
विकी शेंडगे, अमित भुईगळ यांनी दोन टप्प्यांत दर्शन घेतले.

या वेळी ऍड. आंबेडकर म्हणाले, श्री विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेसेज केला आहे. मंदिर भाविकांना खुले करण्यासंदर्भात कार्य प्रणाली तयार करून आठ ते दहा  दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

या वेळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करत मंदिर प्रवेशासाठी परवानगी दिली याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले. याबरोबरच राज्यातील प्रार्थनास्थळे लवकरच खुली केली जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित च्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजन आंदोलन सुरू केले होते आठ वाजल्यापासूनच आंदोलक मंदिर परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक मनोज पाटील पंढरपूरमध्ये दाखल झाले होते
अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे पोलीस निरीक्षक अरुण पवार हे मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन कॅमेरा द्वारे चित्रीकरण केले जात आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

9 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago