ब्रेकींग : राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेसमध्ये विलीन होईल ; सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य

आता दोघेही थकलो असल्याचे सांगत काढले उद्विग्न उद्गार 

0
919

By-MH 13 News, नेटवर्क

विलीनीकरणावर लवकरच होणार शिक्कामोर्तब .!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी पूर्वी एकाच झाडाखाली वाढलेली आहे. भविष्यात आम्ही जवळ येणार आहोत. काँग्रेस एकत्रित होणार आहे,असे संकेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही थकलेले आहेत. आम्ही दोघे कधीकाळी एका आईच्या मांडीवर वाढलेलो आहोत. इंदिरा गांधी , यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व घेऊन पुढे आलो आहोत. त्यामुळे आमच्याही मनात खंत आहे,त्यांच्याही मनात खंत असेल , पण ते बोलून दाखवत नाहीत. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ते करतील. पण त्याची सुरुवात आज विधानसभेच्या निमित्ताने सोलापुरातून एकत्र येऊन काम करत असल्याबद्धल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

सोलापूर शहर उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, शरद पवार आणि माझ्या मैत्रीत अनेकांनी घोळ घालण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यामध्ये कोणाला यश आले नाही. कसे वागावे आणि कसे डावपेच करावेत याची शिकवण शरद पवारांनी आपणास दिली आहे. मीसुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत असताना सामाजिक कार्यकर्ता ,सामान्य आणि गरीब घरातील नगरसेवक बाबा मिस्त्री यांना सोलापूर दक्षिणची उमेदवारी दिली आहे. मिस्त्री यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

दोन मंत्री , एक खासदार,महापालिकेत सत्ता देऊनही त्यांनी सोलापूरकरांनी निराशा केली आहे. दोन मंत्र्यांनी सोलापूरचे वाटोळे केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून आम्ही कोट्यवधींचा निधी आणला , मात्र आता तो पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. सोलापूरकरांनी आतातरी जाणीव ठेवावी असे सांगत धर्माच्या आणि जातीच्या नावावर प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता ठणकावून सांगण्याची वेळ आल्याचेही शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here