कलेक्टर ऑर्डर : आता…खासगी दवाखान्यातून रुग्ण सेवा…

सोलापूर, दि. २२ :- सोलापूर जिल्ह्यातील  सर्व नोंदणीकृत खाजगी हॉस्पिटल, नर्सिंग होम, ओपीडी खाजगी मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक आणि आरोग्यविषयक खाजगी आस्थापना सुरू ठेवून वैद्यकीय सेवेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.

त्यांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांत सेवा सुरू ठेवावे. यासाठी कार्यवाही करीत असताना कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. खाजगी हॉस्पिटल नर्सिंग होममध्ये  रुग्णांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

रुग्णालयातील दोन रुग्णांतील  अंतर तीन फुटांपेक्षा जास्त असावे. रुग्णालयात विषाणू संसर्ग संक्रमित होणार नाही याची विशेष काळजी घेऊन त्या प्रकारची व्यवस्था करावी. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओपीडी मध्ये रुग्णांचे विषयासंदर्भात प्रबोधन करण्यात यावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सदरचे आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था संघटना  कलम 188 कायदेशीर कारवाईस पात्र असेल. अशा व्यक्ती व संस्था संघटना यांच्या विरुद्ध सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्याधिकारी सोलापुर महापालिका आणि जिल्ह्यातील ग्रामीण भाग व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात तालुका आरोग्य अधिकारी यांनी कारवाई करावी, असे शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago