Breaking – अश्विनी हॉस्पिटल निर्जंतुकीकरणासाठी बंद

MH13 NEWS Network

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.त्यामुळे अश्विनी सहकारी रुग्णालय स्वच्छतेसाठी आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र घुली यांनी दिली आहे .
या स्वच्छतेचे काम पूर्ण होताच पूर्ण कार्यक्षमतेने हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेसाठी रूजू होईल असेही त्यांनी सांगितले.या गैरसोयीबद्दल दिलगीर असून रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सहकार्य करावे असा बोर्डही रुग्णालयाच्या गेटवर लावण्यात आलेला आहे.

सध्याला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खाजगी दवाखाने आणि डॉक्टरांना वैद्यकीय सेवेसाठी आवाहन करत आहे. तसेच वैद्यकीय सेवेसाठी हजर न राहणाऱ्या डॉक्टर तसेच वैद्यकीय संस्थेवर कायदेशीर बडगा उगारण्याची ही तयारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दाखवली आहे.दरम्यान इतके सुसज्ज आणि प्रसिद्ध रुग्णालय अचानक कसे निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद करण्यात आले.याची चर्चा नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे

अश्विनी रुग्णालयामध्ये काही स्टाफचे कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाले मुळे आणि काहीजणांची तपासणी आणि अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे रुग्णालयाने गेले काही दिवसापासून दक्षतेपूर्वक रुग्णाची छाननी करुन तपासणी उपचार केलेले आहेत. दोन रुग्णांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे दक्षता घेऊन सुध्दा दाखल झालेमुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे कर्मचारी यांना लागण झालेमुळे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.त्यामुळे संपूर्ण सुरक्षा आणि दक्षतेसाठी आरोग्यसेवेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण हॉस्पिटल बंद ठेवून सर्व विभागांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करुन घेणे आवश्यक असल्याने ही कार्यवाही करीत आहोत. संबंधित कर्मचारी यांची व्यवस्था सिव्हील हॉस्पिटल,महानगरपालिका आरोग्य सेवा यांच्या सहकार्याने केलेली असून काही हॉस्पिटलमध्ये आणि काही विलगीकरण केंद्रात दाखल आहेत.
डॉ. राजेंद्र घुली
वैद्यकीय अधिक्षक

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

2 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

13 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

13 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

16 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

16 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

18 hours ago