Breaking – ट्रॅक्टर नदीत कोसळून 7 जणांचा मृत्यू; ३० गंभीर जखमी

MH13NEWS Network

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळ ट्रॅक्टर नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात 30 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. ट्रॅक्टरमधील सर्वजण ऊसतोड मजूर असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळची ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे अनेक ऊसतोड कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत.बेळगाव नजीक ही घटना घडली आहे.

चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रित सुटल्याने हा भीषण अपघात झाला. सर्व जखमींना तातडीने बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ऊसतोड करणारे कामगार ट्रॅकटरमधून इटगी गावनजीकच्या बाहेरील रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टरचा पुलाच्या कठड्याला धडक बसून तो थेट नदीत कोसळला. यात चार जणांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago