Categories: राजकीय

नौटंकी नाट्य : भाजपचे ‘महाराष्ट्र’ बचाव नसून ‘भाजप’ बचावाचे आंदोलन !

सोलापूर : महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग रोग रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे तोंडावर मास्क लावून महाराष्ट्र बचावाचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा समाचार घेताना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सांगितले की कोरोना संसर्गजन्य रोगाचा नायनाट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार व भाजप सोडून सर्व राजकीय पक्ष मतभेद न करता एकत्रितपणे काम करत असताना भाजपने आपल्या राजकीय सत्तेचा भूक भागविण्यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलनाचे नौटंकी नाट्य रचले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस सत्तेपासून राहू शकत नाही त्यामुळे ते महाराष्ट्रातील जनतेला कोरोना पासून बचाव करण्याची शासनास सहकार्य करत नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारचे चाललेले उत्कृष्ट कार्य जनतेचे दुःख दूर करण्यासाठी चालेलेले प्रयत्न बघवत नाही म्हणून भाजपने महाराष्ट्र बचावची हाक देऊन स्वताच्या बुड़त चाललेला राजकीय अस्तित्व वाचविण्याच्या केविलवाना प्रयत्न करत आहेत असा टोला शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी लगाविला आहे.

तसेच सोलापूर शहरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार कु. प्रणिती शिंदे व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते गेल्या दीड महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता शहरात विविध प्रभागामध्ये हिंडुन जनतेची सेवा करीत आहेत. अन्नधान्य किट, पीपीई कीट, मास्क, सैनिटाइजर, अशा मूलभूत सुविधा देऊन नागरिकांमध्ये असलेला भीतीचं सावट दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत शहर कमिटीच्या कंट्रोल रूम च्या माध्यमातून नागरिक विद्यार्थी व कामगारांचे अडचणीची दखल घेऊन मदत करण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. या मुळे काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकास व काही पदाधिकाऱ्यांना संसर्ग झाला.

कोरोनामुळे शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये बंद झाले आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल ) वर रुगणांच्या अधिक भार पडत आहे म्हणून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, चेतन नरोटे, तौफिक हत्तुरे, फिरदोस पटेल, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगूळे, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांना व  महापालिका आयुक्तांना खाजगी दवाखाने त्वरित चालू करावेत यासाठी निवेदन देऊन पाठपुरावा करीत आले आहेत त्याची दखल घेऊन  जिल्हाधिकारी ,सोमपा आयुक्त यांनी कारवाईचे आदेश काढले

त्यामुळे शहरातील अनेक खाजगी दवाखाने दवाखाने चालू झाले आहेत. परंतु भाजप पक्षांर्गत गटबाजीमुळे व एकमेकाशी समन्वय नसल्यामुळे भाजपचे काम कुठेच शहरात कुठे दिसत नाही हे जनतेला दिसत आहे अशाच दीड महिन्याने आमदार विजय देशमुख यांनी खाजगी दवाखाने चालू करण्याचे निवेदन देऊन आपल्यामुळेच खाजगी दवाखान्यात चालू झाले आहेत असे सांगून स्वतःकडे श्रेय लाटण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करीत आहेत.

महापालिकेमध्ये महापौर व इतर पदाधिकाऱ्यांचा अंकुश राहिला नाही शहरातील काही भागात व हद्दवाढ भागात अजुनही जंतुनाशकाची फवारणी केलेले नाही. पालिकेची दवाखाने नुसते नावापुरते उरले आहेत. शहर उत्तर मध्ये मा. विजयकुमार देशमुख यांनी जनतेसाठी विद्यार्थी व कामगारासाठी कुठलीही मदत केलेली नाही हे वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांमध्ये जनतेला दिसले नाही. त्यांनी आयत्या बिळात नागोबा प्रमाणे त्यांचे वर्तन दिसून येत आहे. असाही टोला सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांनी लगाविला.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

4 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

15 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

16 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

18 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

20 hours ago