सोलापूर | दूध दरवाढीसाठी भाजपचे आंदोलन ; आ.देशमुख म्हणाले…

शेतकऱ्यांकडून खरेदी होत असलेल्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला 30 रुपये भाव ध्यावा, दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये निर्यात अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी शनिवारी भाजपच्या वतीने मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे महाविकास आघाडीच्या विरोधात  महाएल्गार आंदोलन तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, पं.स सदस्य एम.डी. कमळे, पं.स.सदस्य-संदिप टेळे , युवा नेते मळसिद्ध मुगळे, तालुका सरचिटणीस संगप्पा केरकी, युवा मोर्चा उपाध्यक्ष आण्णाराव पाटील, शिव पाटील, दयानंद ख्याडे, शशिकांत पाटील, ग्रा.पं.सदस्य अतुल गायकवाड , शिवराय साखरे, सतीश पटणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे. मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे. येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू: आ. देशमुख
दुधाला 30 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा रुपये अनुदान टाकावे, दूध पावडर निर्यातीस प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. यासाठी दक्षिण तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. दुधाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरकारने लवकरात लवकर दूध दरवाढ करावी अन्यथा भाजपच्या वतीने सर्वत्र तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

43 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

59 mins ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago