Categories: राजकीय

विकासाच्या जोरावर विधानसभेला जनता देईल भाजपला कौल : सहकारमंत्री देशमुख

By-MH13NEWS

सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या भाजपच्या पाठीशी जनता असेल, आपण सर्वजण विधानसभेच्या तयारी जोमाने लागू असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
जामगुंडी मंगल कार्यालय, सोलापूर येथे झालेल्या भाजप शक्तीकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, भाजप सरकारने ५ वर्षात केंद्र व राज्यातील योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आखल्या असून, लाखो गरजूंना त्याचा लाभ आजपर्यंत मिळाला आहे, त्यामुळेच जनतेने ठरवलं आहे की आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं ! त्यामुळे आगामी निवडणूकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सरकारचे केलेले काम व योजना अधिक प्रभावीपणे जनतेसमोर मांडावे.

मेळाव्यास भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूर जिल्हा ग्रामीण प्रभारी अविनाश कोळी,महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूर शहर प्रभारी उमा खापरे, सचिन पटवर्धन, दूधनी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, कल्याणराव काळे, शहर सरचिटणीस बिजु प्रधाने व जिल्ह्यातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, मंडलअध्यक्ष, शहर व जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

मेळाव्याच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थित प्रतिमापूजन पार पाडले, तदनंतर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी पुढील तीस दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाने आखून दिलेलें कार्यक्रम कार्यकर्त्यांनी राबवण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री विजकुमार देशमुख म्हणाले की,” लोकसभा निवडणूक मध्ये कार्यकर्त्याच्या जोरावरच दोन्ही मतदारसंघात आपण नवखे उमेदवार निवडून आणले, अश्या या भक्कम कार्यकर्त्यांच्या बळावरच आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागेवर आपण भाजपचा झेंडा फडकवू” असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्या’ समोर व्यक्त केला.
प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी बैठकीत सर्व तालुक्यातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या कार्याचा आढावा घेतला,” येणार काळ हा भाजपचा सुवर्ण काळ आहे, आज राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे, सर्व जाती धर्माचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विरोधकांची त्रेधातिरपीट झाली आहे, त्यामुळे अश्या स्वच्छ प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढील दोन महिने अहोरात्र परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago