भाजप खासदार महास्वामी ‘त्याच’ षडयंत्राचाच भाग…म्हणाले, ४२०फेल…वाचा

MH13NEWS Network

भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर ४२०चा गुन्हा दाखल करण्यात यावा. सोलापूरच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी खूप मोठ्या स्तरावर प्रस्थापितांनी षडयंत्र
रचले होते खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी त्याच षडयंत्राचाच भाग आहेत.अशी टीका अखिल भारतीय बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तसेच लिंगायत आंदोलन महाराष्ट्रचे समन्वयक शिवानंद हैबतपुरे यांनी केली.सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की खासदार महास्वामी संसदेत जाऊन विचार मांडणार नाहीत. ते महाराज म्हणून फेल,नेता म्हणून नापास आणि नागरिक म्हणून महास्वामी नालायक आहेत. अशा कडव्या शब्दांत त्यांनी टीका केली. खासदार महास्वामी जबाबदार व्यक्ती असून कायद्याच्या पळवाटा काढत आहेत.महास्वामींची नियत खोटी आहे. नैतिकता स्वीकारून महास्वामींनी राजीनामा देऊन मठात बसावे असं ही मत व्यक्त केले.

लिंगायत आंदोलनात खासदार महास्वामींचा कोणताही रोल नाही. मठात अनुसूचित जातीच्या माणसाला बसवून नवा संदेश महास्वामींनी देणे आवश्यक आहे.जात प्रमाणपत्र कागदपत्रे एक बोगस आहेत याची माहिती त्यांना स्वतःला होती असं असूनही त्यांनी ही निवडणूक लढवली आहे. आज ज्या वेळेस कागदपत्रे दाखवण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते कागदपत्रे प्रवासात हरवली असल्याचं सांगत आहेत म्हणजेच या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

खासदार.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याशी याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

2 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

13 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

14 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

16 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

18 hours ago