मोठी बातमी | संचारबंदी तूर्त टळली ; मात्र नागरिकांना पाळावे लागणार ‘नियम’

MH13 News Network

लॉकडाऊन घेण्यात आम्हाला काहीही आनंद नाही, परंतु नागरिकांनी नियम पाळावेत अन्यथा पुन्हा कडक संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल असे महत्त्वपूर्ण विधान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी शहरात एक लाख तर जिल्ह्यात पन्नास हजार रॅपिड टेस्ट घेण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सोलापुरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय अजून 8 दिवस तरी पुढे ढकलण्यात आला असल्याचं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, आज गुरुवारी दुपारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील आरोग्य विभाग ,कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व इतर अधिकारी उपस्थित होते.

आज गुरुवारी दुपारी बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी पोलीस आयुक्त शिंदे व पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली. शहर व ग्रामीण भागात रॅपिड टेस्ट घेण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एकमत झाले असल्याने तूर्तास संचारबंदी पुढे ढकलण्यात आलीय.

कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणे सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर बंधनकारक व नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री भरणे यांनी दिले.

दिवसेंदिवस सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहरात पुन्हा एकदा संचारबंदी लागू करावी लागेल असा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापुरात कडक संचारबंदी लागू होणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली होती. काल बुधवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी MH 13 news च्या विशेष प्रतिनिधीशी बोलताना आज गुरुवारी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लॉकडाऊन संदर्भात तयार केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल आणि तो प्रस्ताव शासन स्तरावर मांडले जाईल असे सांगितले होते.

मागील दोन दिवसापासून नागरिकांनी कुंभार वेस तसेच इतर बाजारपेठेत गर्दी करत किराणामाल भरण्यास सुरुवात केली होती. बँकापुढे ही पैसे काढून घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या,तर पेट्रोल भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी दिसत होती.

संचारबंदी लागू करावी वा नको याविषयी 2 गट तयार झाले होते .अनेक बुद्धिजीवी वर्गांनी आणि नेटिझन्सनी सोशल माध्यमांवर संचारबंदी लागू करावी तर काहींनी लागू करू नये याविषयी आपली मते प्रदर्शित केली होती.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago