मोठी बातमी : महापालिका क्षेत्रात आज पासून ‘आदेश’लागू ; काय राहणार ‘सुरू’ आणि ‘बंद’ …

MH13 NEWS Network

कोरोना विषाणूंमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सोलापूर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांनी काल रविवारी रात्री उशिरा आदेश आणि सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सोलापूर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये हे आदेश आज 1 मे पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू करण्यात येत आहेत.
संचारबंदी (रात्री) – नागरिकांना रात्री नऊ ते सकाळी पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वैद्यकीय सेवा वगळता घराबाहेर पडण्यास सक्त मनाई लागू करण्यात आली आहे 65 वर्षावरील व्यक्ती गंभीर आजार असलेल्या रुग्ण व्यक्ती गरोदर स्त्रिया तसेच दहा वर्षाखालील मुले यांनी घरातच राहावे
प्रतिबंधित क्षेत्र – यामध्ये फक्त अत्यावश्यक बाबींना परवानगी असेल. कंटेनमेंट झोन मध्ये ये -जा होऊ नये यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार निर्बंध सहज आणि टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाणार आहेत यामधील पहिला टप्पा हा 3 जून पासून लागू करण्यात येणार आहे
यामध्ये मैदानी, शारीरिक हालचाली (घराबाहेरील)

यामध्ये सायकल चालविणे ,जॉगिंग धावणे चालणे तसेच सार्वजनिक ठिकाणी असणार्‍या मोकळ्या जागांवर तसेच सार्वजनिक खाजगी क्रीडांगण यासह सोसायट्या संस्थांमधील मैदाने बागा आणि फिरण्यासाठी चे सार्वजनिक रस्ते इत्यादी ठिकाणी वैयक्तिक व्यायाम करण्यास परवानगी असणार आहे .मात्र बंदिस्त स्टेडियम मध्ये किंवा त्याच्या एखाद्या भागात शारीरिक हालचाली अथवा व्यायाम करण्यास परवानगी नाही.

१. सकाळी ५ ते संध्याकाळी ७ दरम्यान यासाठी परवानगी असेल.
२. कोणत्याही सामुहिक / गटाने केलेल्या कार्यास परवानगी असणार नाही. तथापि यावेळी लहान मुलांबरोबर प्रौढ व्यक्ती असणे आवश्यक आहे.
३. लोकांनी केवळ शारिरीक व्यायाम करण्याचे उद्देशाने मर्यादीत कालावधीसाठी घराबाहेर
रहावे. याव्यतिरिक्त कोणत्याही कार्यास परवानगी नाही.
४. लोकांना फक्त घराजवळपास / शेजारच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे.लांब अंतराच्या प्रवासास परवानगी नाही.
५. लोकांनी गर्दी असलेल्या मोकळ्या जागी टाळावे.
लोकांनी शारिरीक व्यायामाचा एक प्रकार म्हणून सायकलचा वापर करणे, जेणेकरुन
आपोआप सुरक्षित अंतर (Social Distance) पाळणे जाईल.

स्वयंरोजगाराशी संबंधीत लोकांनी जसे की, प्लंबर, इलेक्ट्रीशिअन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांनी सुरक्षित अंतर (Social Distance) पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकार असणार आहे.
गॅरेज व वर्कशॉप मध्ये वाहनांनी दुरुस्तीसाठी अगोदर भेटीची वेळ ठरवून काम करावे.
सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा व वैद्यकीय सेवा, ट्रेझरी, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, NIC, अन्नधान्य वितरण, FCI, NYK) कमीत कमी १५ किंवा १५%
मनुष्यबळ यापैकी जे अधिक असेल त्यानुसार चालू राहतील.

मिशन पुनः प्रारंभ – टप्पा-२ आदेश दिनांक ५ जून पासून लागू

शहरामधील मॉल्स व मार्केट कॉम्पलेक्स वगळता सर्व बाजारपेठा, बाजारपेठ क्षेत्रातील दुकान
व्यवसाय ज्या रस्त्यांना दुभाजक नाही अशा ठिकाणची रस्त्यांच्या उजव्या बाजूची (p१) दुकाने
सम तारखेस व रस्त्यांच्या डाव्या बाजूची दुकाने (P२) ही विषम तारखेस उघडी राहतील.
तथापि, ज्या रस्त्यांवर दुभाजक आहेत अशा रस्त्यांच्या दोनही बाजूकडील एक चालू एक बंद
(एकदिवसाडएक) दुकाने चालू राहतील. याबाबतचे कार्यपध्दती निर्देशित करण्यात येईल.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने खालील अटींवर उघडी ठेवण्यास परवानगी असेल
a. कपड्यांची, वस्त्रांची दुकानामध्ये ट्रायल रुमचा वापर करण्यास कोविङ-१९ विषाणूचा प्रसार
होऊ नये म्हणून परवानगी दिली जाणार नाही. तसेच संसर्गाचा प्रसार रोखण्यासाटी वस्तू,
सामान इत्यादी एक्सचेंज पॉलीसी. रिटर्न धोरणांना परवानगी दिली जाणार नाही.
b. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर (Social Distance) चे निकष
पाळण्यासाठी दुकानदार जबाबदार असतील. आणि त्यासाठी त्यांनी जमीनीवर खुणा करणे,
टोकन पध्दती, घरपोच सेवा इत्यादी पध्दतीचा / अवलंब करावा.

करावे. कॅशलेस व्यवहार बंधनकारक राहील. कॅशलेस सेवा होत नसल्याचे आढळून आल्यास
तात्काळ दुकाने बाजारपेठा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल,
लोकांना खरेदीसाठी पायी अथवा सायकलचा वापर करावा आणि शक्य तितक्या जवळच्या बाजारपेठामध्ये खरेदी करावी. अनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.
वाहनांचा वापर कटाक्षाने टाळावा.
d. सुरक्षित अंतराचे (Social Distance) नियम पाळले न गेल्यास तात्काळ दुकाने / बाजारपेठा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

वाहतुकीस खालील प्रमाणे परवानगी

टॅक्सी / कैब मध्ये  वाहनचालक आणि दोघे
रिक्षा मध्ये ड्रायव्हर आणि दोघे
चार चाकी मध्ये ड्रायव्हर आणि दोघे
दोन चाकी एक वाहनचालक

मिशन पुनःप्रारंभ – टप्पा-३ (निर्देश दिनांक ८ जून पासून लागू राहतील)

सर्व खाजगी कार्यालये आवश्यकतेनुसार १०% मनुष्यबळसह कार्यरत राहू शकतील. उर्वरीत
कर्मचारी घरात बसून काम करतील. तथापि सर्व कर्मचाऱ्यांना पुरेशी खबरदारी घेण्याबाबत प्रशिक्षण
द्यावे लागेल. घरी परतताना योग्य ती काळजी घेण्यास प्रोत्साहित करावे जेणे करुन घरातील वृध्दांना संसर्ग
होणार नाही.

क्रिडा संकुल / स्टेडिअम चा बाह्य भाग आणि इतर खुल्या सार्वजनिक जागा वैयक्तिक
व्यायामासाठी खुल्या राहतील. तथापि प्रेक्षक व सांघिक क्रीडा प्रकार करण्यास
परवानगी असणार नाही. बंदीस्त स्टेडिअम मध्ये किंवा त्याच्या एखाद्या भागात
शारिरीक हालचाली अथवा व्यायाम करण्यास परवानगी असणार नाही. सर्व शारिरीक
व्यायाम आणि इतर उपक्रम सुरक्षित अंतराचे (Social Distance) नियम पाळून
करावेत.
यामध्येसुद्धा दुचाकी वाहन चालक एकटा असेल तर तीन चाकी आणि चार चाकी मध्ये ड्रायव्हर आणि दोन व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हा अंतर्गत बससेवा जास्तीत जास्त ५०टक्के इतक्या मर्यादेपर्यंत आणि
शारिरीक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून सुरु राहील. शहर अंतर्गत
बससेवेबाबतचे वेगळे आदेश काढण्यात येणार .
V. अंतर जिल्हा बससेवा चालू असणार नाही.
VI. सर्व मार्केट / दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५वाजेपर्यंत उघडी राहतील.
तथापि, कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर (Social Distance) पाळले गेले नाही
अथवा गर्दी केल्यास सदरचे मार्केट / दुकाने बंद करण्यात येतील.
८. पुढील सेवा, कामे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधीत राहतील सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था बंद राहतील.
11. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रतिबंधीत राहील. तथापि सुरक्षा कारणास्तव गृह
मंत्रालय भारत सरकार यांनी सुट दिलेल्या बाबी प्रतिबंधीत असणार नाहीत.
III. रेल्वे आणि देशातर्गत हवाई वाहतूक यांच्याद्वारे प्रवाशांची होणान्या वाहतूकीस
स्वतंत्र आदेश मिळाल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही.
IV. सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, व्यापारी संकुले, व्यायामशाळा, क्रिडा संकुले, जलतरण
तलाय, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, बार, सभागृह, नाट्यगृहे, वॉटरपार्क, म्युझिअम,मंगल कार्यालये, यासारखी तत्सम सर्व ठिकाणे बंद राहतील.
V. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक सांस्कृतिका धार्मिक इत्यादी
विषयक इतर सर्व प्रकारचे जमावावर बंद राहतील.
सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच अशा ठिकाणी धार्मिक एकत्रिकरणाला कडक निबंध राहील.
केस कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटीपार्लर इत्यादी बंद राहतील.
VIII. मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहतील.
सर्व वैद्यकीय डॉक्टर व कर्मचारी, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी,अॅम्ब्युलन्स यांची आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतूक करण्यास परवानगी असेल.
तथापि आंतरराज्यीय आणि अंतर जिल्हा व्यक्तींची हालचालीचे नियमन करण्यात
येईल. अडकलेले कामगार, आंतरराज्य व राज्याअंतर्गत वाहतूक करण्यास
परवानगी असेल.त्याचप्रमाणे श्रमिक विशेष रेल्वेने जाणाऱ्या व्यक्तींची हालचाल यापूर्वी दिलेल्या
निर्देशानुसार करण्यात येईल.
IV. देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांची आणि परदेशी प्रवासास गेलेल्या व्यक्तींची हालचाल व त्यांना परत आणण्याबाबत ची कार्यवाही यापूर्वी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येईल.
V. सर्व प्रकारच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना, (मोकळे ट्रक यांचेसह)
आंतरराज्यीय वाहतुकीस परवानगी असेल.

आरोग्य सेतु ॲप्स चा वापर
आरोग्य सेतू ॲप कार्यालयात व कामाच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी यांच्या मोबाईल फोन मध्ये असल्याची संबंधित विभागाने खात्री करावी तसेच नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये हा ऍप घ्यावा आपल्या आरोग्याची स्थिती सतत अपडेट करावी त्यामुळे योग्य वेळी धोका ओळखून वैद्यकीय सुविधा पुरवणे सोयीचे होईल.
हे करा अन्यथा दंडात्मक कार्यवाही
चेहरा झाकणे सर्व सार्वजनिक स्थळी कामाच्या ठिकाणी प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्क रुमाल वापरणे बंधनकारक सुरक्षित अंतर सार्वजनिक स्थळी सर्वांनी एकमेकांमध्ये किमान सहा फूट अंतर दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर तसेच पाचपेक्षा अधिक ग्राहकांना एकाच वेळी दुकानात येण्यास परवानगी नाही मोठ्या सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी विवाहस्थळी जास्तीत जास्त 50 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी अंत्यसंस्कार ठिकाणी जास्तीत जास्त 20 लोकांना एकत्र जमण्यास परवानगी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यास बंदी तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पान गुटखा तंबाखूचे सेवन बंदी

कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम करून घ्यावे, कार्यालय ,कामाचे ठिकाणी, दुकाने, मार्केट तसेच औद्योगिक व वाणिज्य आस्थापनांमध्ये कामांच्या वेळामध्ये पुरेसे अंतर कामाच्या ठिकाणी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश तसेच सॅनीटायझरचा वापर

महापालिका क्षेत्रात 19 जून पर्यंतच्या आदेशापर्यंत दिलेली परवानगी
जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने उघडी राहतील महापालिका हद्दीत पूर्वपरवानगी दिलेले व पूर्वी बांधकाम चालू असलेले पावसाळ्याच्या दृष्टीने सर्व अत्यावश्यक प्रकल्प खाद्यगृह रेस्टॉरंट मध्ये घरपोच सेवा ऑनलाईन दुरुस्त शिक्षण सुविधा सुरू शासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्के इतक्या क्षमतेने अथवा दहा कर्मचारी यापैकी जास्त असतील तितके मनुष्यबळ उपस्थित राहील असे या आदेेेशात नमूद केलं आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago