आत्ताची सर्वात मोठी बातमी! – विडंबन

नमस्कार, मी विनम्रता आगळे. आणि ए तुबी पी माझा मध्ये तुमचे स्वागत आहे. आत्ताच हाती आलेली सगळ्यात मोठी बातमी.
भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. आमच्यासोबत आहेत प्रशांत. प्रशांत काय माहिती देशील ? सत्तेची समीकरणे कशीकाय बदलली आहेत ?

प्रशांत : नक्कीच विनम्रता. आत्ताच मी ह्या चारही पक्षांच्या प्रवक्त्यांसोबत बारमध्ये बसलो होतो. साले मला दारु पाजून निघून गेलेत आणि म्हणाल्यात आमचा मुख्यमंत्री झाला की पैसे भरतो. विनम्रता.

विनम्रता : नक्कीच प्रशांत. मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि मंत्रिमंडळावर वर्चस्वी कोणाची असेल काही सांगू शकता का ?

प्रशांत : नक्कीच विनम्रता. प्रकाश आंबेडकरांनी काल शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांना शिवसेना प्रवेशाबात विनंती केली. नेमक्या त्याचवेळी सोनिया गांधीनी रामदास आठवले साहेबांना फोन करुन मनसेच्या मनधरणीसाठी आदित्य ठाकरेंना वर्षा निवासस्थानी बोलवलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली असून दोघेही आता उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी रवाना झालेत.

विनम्रता : नाही नाही प्रशात. मला याठिकाणी थोडी दुरुस्ती करावीशी वाटते. प्रकाश आंबेडकर पवार साहेबांना शिवसेना प्रवेशाबाबत कशीकाय विनंती करु शकतात ?

प्रशांत : सॉरी विनम्रता माय फॉल्ट. प्रकाश आंबेडकरांनी केली नसेल तर जयकाल शिकरे प्रकाश राज यांनी केली असेल. आपल्याला काय, जायचं की न जायचं हा त्याचा प्रश्न.

विनम्रता : नाही नाही प्रशांत. म्हणजे पवार साहेबांना शिवसेनेत घ्यायचे असेल तर उद्धव ठाकरे विनंती करतील ना ? प्रकाश आंबेडकर कशाला करतील ?

प्रशांत : नक्कीच विनम्रता. पण प्रश्न हा आहे की पवार साहेबांचा स्वत:चा पक्ष असताना ते शिवसेनेत कशाला प्रवेश करतील ? कृपया चुकीचे प्रश्न विचारून माझा गोंधळ उडवू नको. कारण, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांची भेट झाली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी मनसेत विलीन करावी अशी विनंती ट्यात केली असावी. विनम्रता

विनम्रता : प्रशांत प्रशांत तुम्ही चुकीची माहिती देताय. मनसे हा पक्ष राजसाहेबांचा आहे.

प्रशांत : हे बघ विनम्रता. मनसे हा जनतेचा पक्ष आहे. आणि हे सरकार जनेतेचे आहे. राजसाहेब ठाकरे हे वंचित बहुजन आघाडीसोबत सत्ता स्थापन करणार असून त्यांनी उद्धव ठाकरे यांना सहकुटूंब भोजनाचे आमंत्रण दिले आहे.

विनम्रता : प्रशांत सत्तेबाबत बोला प्लिज. आपन लाइव आहोत. सत्ता आणि मुख्यमंत्री पदाबाबत कोणती माहिती आहे, ती सांगा प्लीज.

प्रशांत : ओह, नक्कीच विनम्रता. आज राष्ट्रवादी काँग्रेस मॅजिक फिगर गाठणार असून ३६- २४- ३६ ही मॅजिक फिगर आहे. मॅजिक म्हणजे जादू आणि जादू म्हणजे रितिक रोशन. आमचा पोरगा नाव रोषण करणार असं विखे पाटलांना वाटलं होतं तसं राणेंनाही वाटलं होतं. पण, गोमु संगतीनं माझ्या तु येशील का ? माझ्या पिरतीची राणी तु होशील का ?

विनम्रता : प्रशांत प्रशांत, सत्तेविषयी बोला प्लीज. आज राष्ट्रवादी बहुमत सिद्ध करु शकते का ? तुम्हाला काय वाटते ?

प्रशांत : नक्कीच विनम्रता. नक्कीच राष्ट्रवादी बहुमत सिद्ध करु शकते. कारण त्यांच्यातलं कुणीच सास बहुची सिरीयल पाहत नाही. सीरीयल किलर मुंबईत फिरत असला तरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण, ती आमच्या महाराष्ट्राची अस्मिता असून अस्मिता माझ्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. चार दिवस झालं तिच्यासोबत बोलणंबी नाय झालं.
(मोठ्याने रडत) अस्मिता… ये अस्मिता…

विनम्रता : प्रशांत मी तुमचं दुःख समजू शकते. पण, सत्ता, राजकारण, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोला प्लिज. प्रशांत.

प्रशांत : (डोळे पुसत) नक्कीच विनम्रता. चार दिवस हा बुंबरा घेऊन फिरतोय. पण, मला अजून मेळ बसाना की मी दहावी पास का झालो. नापास झालो असतो तर गावाकडं शेळ्या वळाय गेलो असतो.
(चिक्या आवाजात) आयघातली पास झालो आन झक मारायला जर्नलिजम केलं. आन आता ही दांडक घेऊन फिरतोय. तिकडं सत्ता स्थापन होईना आन् हिकडं आम्हाला हागायबी टाईम भेटेना. ये बंद कर तो कॅमेरा. फेक फेक नायतर हाच ग्लासच फेकून हाणत असतो पळ. पळ. पार जिंदगी उदास केली ह्या राजकारणनी आणि ह्या पत्रकारितेने..
(पुन्हा रडत) ये अस्मिता… ये अस्मिता

विनम्रता : तर काही तांत्रिक कारणामुळे आपला प्रशांतशी संपर्क तुटला आहे. पण, तुम्ही कुठेही जाऊ नको. बघत बसा ए तुबी पी माझा.

©नितीन थोरात

*ही विडंबनात्मक बातमी आहे.. धन्यवाद! वास्तवाशी कोणताही संबंध नाही, असल्यास निव्वळ योगायोग समजावा. माध्यमांनी आणि पक्षांनी सुद्धा समाजभान राखलं पाहिजे. TRP च्या मागे पळत सुटताना इथल्या सामान्य, माणसाला काय हवं आहे हे आपण विसरत चाललोय का हा विचार व्हावा हाच शुद्ध हेतू…

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago