Banned | टिक टॉक आणि हॅलोसह 59 चिनी App वर भारतात बंदी

MH13 News Network

भारत -चीन यांच्यातील वाढता संघर्ष लक्षात घेऊन देश आणि समाज हिताला घातक असणारे चिनी ॲप बंद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.

टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चिनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. माहिती प्रसारण खात्यानं आयटी ऍक्टच्या सेक्शन 69A अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.

टिकटॉक, पबजी, यूसी ब्राउजर आणि शेअरइट सारख्या ऍप्सचा यामध्ये समावेश आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेत बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी जारी केली आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अॅपमुळे धोका असल्याचं भारत माहिती प्रसारण खात्याचं म्हणणं आहे.

भारतातल्या कोट्यवधी इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचं माहिती प्रसारण खात्यानं म्हटलंय.

यामुळे भारताच्या सायबरस्पेसची सुरक्षा राखणं सोपं होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बंदी घालण्यात आलेले  अॅप

टिकटॉक
शेअरइट
क्वाई
यूसी ब्राऊजर
बैदू मॅप
शीन
क्लॅश ऑफ किंग्स
डीयू बॅटरी सेव्हर
हॅलो
लाइकी
यूकॅम मेकअप
मी कम्युनिटी
सीएम ब्राऊजर
व्हायरस क्लीनर
एपीयूएस ब्राऊजर
रोमवी
क्लब फॅक्टरी
न्यूजडॉग
ब्युटी प्लस
वीचॅट
यूसी न्यूज
क्यूक्यू मेल
वीबो
झेंडर
क्यूक्यू म्युझिक
क्यूक्यू न्यूजफीड
बिगो लाईव्ह
सेल्फी सिटी
मेल मास्टर
पॅरलल स्पेस
वीसिंक
इएस फाईल एक्सप्लोरर
व्हीवो व्हीडिओ – क्यू यू व्हीडिओ इंक
मेंतू
व्हीगो व्हीडिओ
मी व्हीडिओ कॉल – शाओमी
न्यू व्हीडिओ स्टेटस
डीयू रेकॉर्डर
व्हॉल्ट – हाईड
कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ
डीयू क्लीनर
डीयू ब्राऊजर
हागो प्ले वीथ न्यू फ्रेंड्स
कॅम स्कॅनर
क्लीन मास्टर – चीताह मोबाईल
वंडर कॅमेरा
फोटो वंडर
क्यूक्यू प्लेअर
वी मीट
स्वीट सेल्फी
बायडू ट्रान्सलेट
व्हीमेट
क्यूक्यू इंटरनॅशनल
सिक्युरिटी सेंटर
क्यूक्यू लॉन्चर
यू व्हीडिओ
व्ही फ्लाय स्टेटस व्हीडिओ
मोबाईल लिजंड्स
डीयू प्रायव्हसी
सरकारनं बंदी घातल्यामुळे आता ऍन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्ले स्टोरमधून हे अॅप्स भारतात हाटवले जातील.

दरम्यान भारत सरकारनं लोकांना या ऍप्सला अनइनस्टॉल करण्याचं आवाहन मात्र केलेलं नाही. त्यामुळे लोकांना त्यांची इच्छा असेपर्यंत हे त्यांच्या फोनमध्ये कायम राहू शकतील. त्यांना मॅन्युअली हटवल्यानंतरच ते जाऊ शकतील. पण लोकांना आता हे अॅप अपडेट करता येणार नाहीत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago