बाळे येथील श्री खंडोबा देवस्थान यात्रेस उत्साहात प्रारंभ

MH13 NEWS NETWORK:

बाळे येथील जागृत देवस्थान खंडोबा यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी यात्रेस येत असतात या कालावधीत पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी श्री ची काकड आरती सकाळी ठीक आठ वाजता व रात्री सात वाजता दोन वेळा महापूजा अभिषेक करण्यात येतो तसेच दिवसभर जागरण गोंधळ; वाघ्या मुरळी नाचणे ;तळी भंडारा उचलणे ;वारू सोडणे; नवस फेडणे व जावळ काढणे इत्यादी विविध धार्मिक  कार्यक्रम होत असतात तसेच रात्री आठ वाजता श्री खंडोबा देवाची पालखी घोडा व विद्युत रोषणाईने सोलापूर येथून आलेले मानाचे नंदीध्वज  मिरवणूक सह धार्मिक लंगर तोडणे विधी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते व तिसऱ्या रविवारी रात्री ठीक आठ वाजता शोभेचे दारूची रोषणाई केली जाते मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या  वतीने भाविक व यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ; सोलापूर महानगरपालिका कडून  सिटी बस  सेवा ; पाण्याची सोय तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा ची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचबरोबर समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या व विविध विधींच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेची व्यवस्थितरीत्या नियोजन करीत असतात.
पौष  शुद्ध षष्ठी म्हणजे बांगर षष्ठी वार सोमवार बुधवार  दिनांक 1/1/202012 रोजी महाप्रसाद करून सर्व पाटील ;तोडकरी ;कांबळे सुरवसे ; गावडे इत्यादी मानकरी व भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

मोठा दिलासा | कोरोनाची लस मिळणार केवळ 225 रुपयात !

संपूर्ण जगाला वेढणाऱ्या कोरोना महामारी विरुद्ध सर्व पातळ्यांवर लढाया सुरू आहेत .कोरोनाची लस कधी उपलब्ध…

1 min ago

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago