सहाय्यक फौजदार सहदेव जगदाळे यांचे निधन

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी:

माढा येथील सहदेव मच्छिंद्र जगदाळे वय 47 यांचे सोलापूर येथे अल्पशा आजाराने  दि.7/1/2021 रोजी निधन झाले ते कुर्डुवाडी पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. काही दिवसा पुर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे .त्या दुःखातुन अजुन सावरले नसताना सहदेव यांच्या अचानक जाण्याने जगदाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

नुकतेच त्यांच्या पोलिस खात्यातील कर्तव्यदक्ष कामगिरी मुळे त्यांना सहाय्यक फौजदार या पदावर बढती मिळाली होती. यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले,दोन बहिणी, एक भाऊ, वहिनी,असा मोठा परिवार आहे. पोलिस खात्यातील एक प्रामाणिक मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरवल्याने माढा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


माढा शहराला कर्तबगार पोलीस कर्मचाऱ्यांची अभिमानास्पद परंपरा आहे. माढा शहराचे पोलिस दलात अनेक कर्तव्यदक्ष पोलीस आहेत. शहरासाठी दुर्दैवी योग असा की काहीशा अल्पकालावधीत त्यांच्या तीन मिञांचे निधन झाले. शालेय जीवनातील जीवाभावाचे मिञ व क्रीडाक्षेत्रात खो-खो या विभागात माढा शहराचे संपूर्ण राज्यात दबदबा निर्माण करणारे कै.मदन देवकते, कै. कैलास काकडे, कै.रविंद्र जाधव, कै.सहदेव जगदाळे असे एका पाठोपाठ एक पोलिस खात्यातील तरूण उमद्या व्यक्ती जाणे पोलिस खात्याला व माढ्यासाठी अत्यंत दुर्दैवी व दु:ख देणारी आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इफेक्ट ; आदेश जारी,ससेहोलपट थांबली,आता…जन्म- मृत्यू दाखले महापालिकेत मिळणार…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

11 mins ago

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

2 hours ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

5 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

9 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

1 day ago