स्वॅबचा अहवाल मिळावा तत्काळ, सिव्हीलमध्ये सीसीटीव्ही बसवा..

सोलापूर  :  कोराना संशयित रूग्णाची स्वॅब टेस्ट लवकर घेऊन त्याचा  अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी, खासगी दवाखान्यात जर कोरानाग्रस्त रूग्ण आढळला तर लगेच दवाखाना सिल करू नये, सिव्हील प्रशासनाबद्दल अनेकांच्या तक्रारी येत आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा सिव्हीलमध्ये बसवावेत, स्वस्त धान्य दुकानातून रेशनची व्यवस्था सुरळीत करावी, यासह विविध सूचना माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या.
आ. देशमुख यांनी गुरूवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कोरानाबाबतचा आढावा घेतला.  यावेळी आ. देशमुख  यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोराना रूग्ण वाढत आहेत. स्वॅब स्टेट करून त्याचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे स्वॅब स्टेट लवकर घेऊन त्याचा अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी, खाजगी दवाखान्यात रूग्ण सापडल्यास दवाखाना सिल ना करता योग्यपणे काळजी घ्यावी व तेथील डॉक्टर याना विश्वासात घेऊन काम करावे, सिव्हीलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर व्यवस्थित काम करतात की नाही हे पाहण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आशा वर्कर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचे चार महिन्याचे वेतन थकले आहे ते त्वरित मिळावे,  रेशन धान्य दुकानातून अजूनही सुरळीत धान्य पुरवठा होत नाही, अशा तक्रारी आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घालून लोकांना धान्य व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, प्रत्येक वॉर्डात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची सोय करावी, रेल्वे ग्राऊंडवर कोव्हीड रूग्णालय करण्यासाठी विचार करावा, भीमा नदीला पाणी सोडले आहे मात्र दक्षिण तालुक्यात दोनच तास वीज सोडल्याने त्याचा उपयोग नाही, त्यासाठी चार तास वीज पुरवठा करावा, कोरानामुळे मृत्यू झालेल्या घरातील कुटुंबियांना क्वारंनटाईन केले जात आहे, त्यांच्याही अनेक तक्रारी आहेत, त्या सोडवाव्यात आदी सूचना जिल्हाधिकार्‍यांकडे केल्या.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

9 mins ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

10 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

19 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

20 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

21 hours ago

निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार…

21 hours ago