साहित्यकार, लेखक, कवीवर्य, अरुणकुमार यादव यांचे निधन

0
83

सोलापूर, प्रतिनिधी

जेष्ठ (साहित्यकार) पत्रकार, लेखक, कवीवर्य, अरुणकुमार निवृत्ती यादव यांचे दिनांक ९ सप्टेंबर २०१९ रोजी, वय ६९ , ते अवंती नगर, जुना पुना नका ,सोलापूर येथे राहत होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अरुणकुमार निवृत्ती यादव हे महाराष्ट्राला परिचय असलेले ज्येष्ठ पत्रकार / साहित्यिक असून श्री . अरुणकुमार निवृत्ती यादव यांनी ४० वर्षांचा अनुभव साहित्य लेखनात उपयोगात आणला . मुंबई , पुणे , सोलापूर आकाशवाणी , दूरदर्शन आणि स्थानिक चॅनलमधूनही भरपूर प्रसिद्धी मिळविली होते. मराठी रंगभूमीची ते आजतागायत सेवा होत . या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला होते . पत्रकारितेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत राज्य पातळीवरचे डॉ . ना . भि परुळेकर , लोकहितवादी देशमुख , साहित्यरत्न , पत्रकाररत्न तसेच मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सामाजिक आणि पत्रकारितेच्या योगदानाबद्दल फेलोशील देखील मिळाली आहे . ते पत्रकारितेच्या बिहार विधेयकाविरुद्धच्या महाराष्ट्रातील ९२ पत्रकरांच्या लढ्यात सहभागी होते . त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ” क्राईम लेखनाचा बादशहा ” म्हणून आहे . त्यांचे ‘ शब्दपालवी ‘ ( काव्यसंग्रह ) कलम ३०२ ‘ ( सत्यकथासंग्रह ) ‘ घुगरात रंगली लावणी ‘ ( लावणी संग्रह ) सुवर्णस्पर्श , सीआयडीच्या तपास कथाचा ( कथासंग्रह ) प्रसिद्ध झाला आहे . आता ‘ हृदयी वसंत फूलला . . . ‘ कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे . गेली अनेक वर्षांपासून ते साप्ताहिक डॉग वाँच , पोलिस करंटचे संपादक होते . राज्यातील अनेक , मराठी – हिन्दी दैनिकांचे सध्याचे प्रतिनिधी होते. विशेष म्हणजे कवितांबरोबर लावणी – कथा लेखनामध्ये त्यांना बहुमान मिळाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here