‘बाप्पा’च्या मूर्ती संकलनाची ‘या’ ठिकाणी व्यवस्था !

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सन २०२० च्या सार्वत्रिक गणेशोत्सव कार्यक्रमानुसार श्रीचे विसर्जन दि.०१/०९/२०२० रोजी असून त्याबाबतीत महाराष्ट्र शासन, गृह विभाग, यांनी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
गणेशोत्सव व इतर सन या पार्श्वभूमीवर निर्बंध घालून साजरा करणे आवश्यक असले वरून पोलीस आयुक्त सोलापूर शहर व आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी श्रीचे विसर्जन मिरवणूक संबंधी परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.
१) घरगुती अथवा सार्वजनिक श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे अनुक्रमे घरीच अथवा स्थापन केलेल्या ठिकाणी करण्यात यावे.
२) सार्वजनिक ठिकाणी विसर्जनास परवानगी असणार नाही.
३) गणपती विसर्जनासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यास श्री गणेश मूर्ती सोलापूर महानगरपालिकेने निश्चित केलेल्या संकलन केंद्र येथे सुपूर्त करण्यात यावेत.
४) सोलापूर महानगरपालिकेकडून श्री गणेश मूर्ती संकलित करनेकामी विभागीय कार्यालय अंतर्गत समाज मंदिर, शाळा, मंगल कार्यालय इ.ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे.
५) सोलापूर महानगरपालिकेकडून संकलित करनेकामी विभागीय कार्यालया अंतर्गत वाहतुकीसाठी वाहनांची सोय करण्यात आलेली असून प्रभाग निहाय श्री गणेश मूर्ती आवश्यकतेप्रमाने संकलित करणेसाठी मार्ग निश्चित केले असून त्या मार्गावर संकलित करणे करीता आलेल्या वाहनामध्ये नागरिकांनी श्री गणेश मूर्ती सुपूर्द करण्यात यावेत.
६) सोलापूर महानगरपालिकेकडून निश्चित केलेल्या संकलन केंद्राची माहिती घंटागाडीच्या माध्यमातून स्पीकर द्वारे प्रसारित करण्यात येत आहे

७) सोलापूर महानगरपालिकेकडून संकलित केलेल्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे अनुषंगाने तुळजापूर रोडवरील मंठाळकर वस्तीलगत शासकीय मालकीची खदान येथे नियोजन करण्यात आलेले आहे.
८) श्री गणेश मूर्तीचे संकलन करणे, संकलित केलेल्या मूर्तीचे यथायोग्य पद्धतीने विसर्जन करणे कामी महानगरपालिकेकडील विभागीय कार्यालयाचे सहा.आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व सेवक वर्ग नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
९) श्री गणेश मूर्तीचे संकलन केंद्र व विसर्जन चे ठिकाण यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येत आहे.
सोलापूर शहरामध्ये कोविड -१९ च्या उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी गणेश विसर्जन साठी महापालिकेकडून निश्चित केलेल्या कार्यपद्धतीसाठी नागरिकांनी व सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदावर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांनी केलेले आहे.

सोबत संकलन केंद्रची यादी आहे

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago